संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोशल मीडियावर मिळतो बाजारभाव

टीम अॅग्रोवन

वाशीम : सोशल मिडीयाचा शेतकरी हितासाठी उपयोग करण्यासाठी बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना नियमित ते उपलब्ध करून देत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी आणावा किंवा नाही याविषयी निर्णय घेता येतो.

वाशीम बाजार समिती ही विदर्भातील मोठी आणि नावलौकिक बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये जिल्ह्याबरोबरच शेजारी असलेल्या हिंगोली, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातून शेतमाल विक्रीला येतो. चांगला भाव, नेट वजन आणि रोखरक्कम त्याचबरोबर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांवर असलेला शेतकऱ्यांचा विश्‍वास यामुळे दरदिवसाला पाच हजार क्विंटलवर शेतमाल विक्रीस येतो.

एकमेकांना विचारुन किंवा शेतमाल विकून परतणाऱ्या वाहन चालकास दराबाबत शेतकरी पूर्वी विचारत होते. मात्र वाशीम बाजार समितीचे संचालक राजूभाऊ चौधरी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दोन वर्षापासून नियमित बाजारभाव उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी कोठे न्यावा, याचा निर्णय शेतकऱ्यांना घेणे सुलभ झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी व्हाट्स ॲप ग्रुप वाशीम तालुक्‍यातील वाळकी माजरे येथील प्रगतशील शेतकऱ्याने व्हाट्स ॲप ग्रुप बनवून या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून देत आहेत. तसेच शेतीबद्दल सल्ला, माहिती पिकांवर येणाऱ्या रोगांवर औषधी फवारण्याबाबत माहिती देत आहेत. या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी तसेच कृषी तज्ञांचा सहभागी असल्याने शेतकऱ्यांकडून मागविण्यात आलेल्या माहितीबाबत कृषीतज्ज्ञांकडून त्वरित माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना शेती करताना चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT