सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर करा
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर करा 
मुख्य बातम्या

सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर करा

टीम अॅग्रोवन

अकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांमध्ये अातापर्यंत अत्यल्प पाऊस झालेला असल्याने पिके धोक्यात अाली अाहेत. अकोट तालुक्यातील  बोर्डी परिसरावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून फळपिकांची अवस्था बिकट झालेली अाहे. किडींचाही प्रादुर्भाव वाढला अाहे.

यंदा सुरवातीपासून बोर्डी परिसरात अत्यल्प पाऊस झाला अाहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगविली. मात्र मागील वर्षीसुद्धा पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे भुजलपातळीतही घट झाली. त्यामुळे विहिरी, बोअरवेलने तळ गाठले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भिती अाहे.

शेतकऱ्यांनी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली होती. आता कपाशीसारखे पीक बोंड भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याची कमतरता भासत आहे. बऱ्याच शेतांमध्ये सोयाबीन व उडिदाच्या शेंगा भरण्याची अवस्था आहे. आता पाऊस नाही आला तर सगळी मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली अाहे.

संत्रा बागांनाही फटका या भागात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणात अाहेत. त्यांनासुद्धा वातावरण आणि कमीजास्त पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून संत्र्याचा आंबिया आणी मृग बहार कमी प्रमाणात फुटत अाहे. त्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. संत्रा पिकाची नुकसानभरपाई मिळावी म्हणून वारंवार कृषिखाते, पालकमंत्री, कृषिमंत्री, आमदारांना निवेदने देण्यात अाली. परंतु सर्वेक्षणाशिवाय काहीही झालेले नसल्याचा अारोप या भागातील शेतकरी करीत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT