हिंगोली, नांदेड, परभणीत कपाशीचा हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे
हिंगोली, नांदेड, परभणीत कपाशीचा हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात कपाशीचा हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या, बरड जमिनीवरील कपाशीची सर्वच बोंडे फुटली आहेत. अनेक ठिकाणी एकाच वेचणीनंतर केवळ पऱ्हाटी शिल्लक राहत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे पाते, फुले, बोंडे लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीचा हंगाम लवकरच आटोपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गतवर्षी बोंड अळीमुळे नुकसान झाल्यामुळे यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट झाली. या तीन जिल्ह्यांत कपाशीचे सरासरी क्षेत्र ६ लाख १५ हजार ४८५ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात ४ लाख ८६ हजार हेक्टरवर लागवड झाली.

यंदा जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात लागवड झालेल्या कपाशीवर लवकरच बोंड अळीचा प्राद्रुर्भाव झाला. त्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यात आणि आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा दीर्घ खंड पडला. परिणामी वाढ खुंटली. बोंडे पूर्णपणे भरली नाहीत. अनेक भागात कपाशीच्या झाडावरील सर्वच बोंडे फुटली आहेत. केवळ एकाच वेचणीनंतर केवळ नख्या आणि पऱ्हाटी शिल्लक राहत आहे. त्यामुळे यंदा कोरडवाहू क्षेत्रातील कापूस हंगाम दिवाळीपूर्वीच आटोपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पावसाअभावी कपाशीची पाने गळाल्याने लवकरच झाडपाला वाळून गेला. त्यामुळे झाडांना पाणी देऊन उपयोग होत नाही. एक वेचणी झाली दुसरी सुरू आहे. बोंड अळीग्रस्त बोंडातील कापूस व्यवस्थित वेचता येत नाही, तिसरी वेचणी होण्याची शक्यता नाही. यंदा दिवाळीच्या आधीच कापसाचा हंगाम संपणार आहे. - अकुंश वानखेडे, शेतकरी, कपालेश्वर बीट सावंगी, ता. लोहा, जि. नांदेड

बरड्या रानातील बारीक बोंडे करपून गेली. उतारा घटला आहे. जेमतेम महिन्याच्या आतच कापसाचा हंगाम संपणार आहे. - विष्णू निर्वळ, शेतकरी, रुढी, ता. मानवत, जि. परभणी

पावसाच्या दीर्घ खंडामुळे यंदा विशेषतः हलक्या जमिनीवरील कपाशीमध्ये लवकर परिपक्वता आली. पाऊस आल्यानंतर भारी जमिनीवरील हिरव्या कपाशीच्या पिकाला बहर फुटू शकतो. - डॉ. के. एस. बेग, प्रभारी अधिकारी वनामकृवि, कापूस संशोधन केंद्र, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT