अंडिपुंज
अंडिपुंज 
मुख्य बातम्या

रेशीम अंडीपुंजांचा तुटवडा

Santosh Munde

औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम उद्योगाला अंडीपुंज उपलब्धतेचा तुटवडा जाणवत आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या रेशीम कोष उत्पादनावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्याने अंडीपुंज निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अंडीपुंज पुरवठ्याचा विषय केंद्र सरकारच्या अधिनस्त यंत्रणेकडे असल्याने त्यावर कधी निर्णय होतो, याकडे रेशीम उत्पादकांचे लक्ष लागले आहे.   पान १ वरून महाराष्ट्रात रेशीमचा विस्तार झपाट्याने होत आहे. खासकरून मराठवाड्याने राज्याच्या रेशीम कोष उत्पादनात निम्मा वाटा उचलला आहे. सततच्या दुष्काळामुळे एकीकडे सर्वच शेती नुकसानीची ठरत असताना रेशीम मात्र शेतकऱ्यांना शाश्वत आधार देत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून रेशीम विस्तारासाठी चॉकी सेंटर निर्मिती, अंडीपूंज निर्मिती केंद्रासाठी पावले उचलली जात असताना अंडीपूंजाच्या तुटवड्याने महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादनाला ब्रेक लावला आहे.  प्राप्त माहितीनुसार राज्यातील नोंदणीकृत तुती लागवडीच्या क्षेत्राचा अंदाज घेऊन मे मध्ये राज्याकडून केंद्राकडे जवळपास पाच लाखावर अंडीपुंजाचा पुरवठा करावा लागेल याविषयी मागणी केली होती. त्यानंतर अलीकडे ऑक्‍टोबरच्या मध्यान्हात पुन्हा जवळपास सव्वाचार लाख अंडीपूंजाची मागणी करण्यात आली. त्याचवेळी आधीची मागणी केलेले अंडीपूंज मिळाले नसल्याची आठवणही केंद्रीय स्तरावर करून देण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत याविषयी चिंतन होऊन लवकरच अंडीपूंज पुरवठा करण्याविषयी पावले उचलले जातील असे कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही अंडीपूंज मिळण्याचा मार्ग सुकर न झाल्याने कोष उत्पादनासाठी अंडीपूंजाच्या अनुप्लब्धतेने अडथळा निर्माण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात त्याचा थेट परिणाम राज्यातील रेशीम कोष उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. असे व्हायला हवेत प्रयत्न

  • अंडीपूंज निर्मिती केंद्राच्या उभारणीला गती देणे
  • खासगी अंडीपूंज निर्मितीला प्रोत्साहन देणे.
  • मिळेल तिथून खात्रीशीर दर्जेदार अंडीपूंज उपलब्ध करणे.
  • आता निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन पुढील सर्व वर्षाचे नियोजन करणे.
  • प्रतिक्रिया चॉकी सेंटरच्या माध्यमातून सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये जवळपास साडेसात हजार अंडीपूंजाची मागणी नोंदविण्यात आली होती, परंतु अजून पुरवठा झाला नाही. त्यासंदर्भात आमच्या स्तरावरून रेशीम विभागाकडे मागणीनुसार उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहे. - मंगल संतोष वाघमारे, चॉकी केंद्रचालक, केकतजळगाव.

    अंडीपूंजाची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अंडीपूजाची कमतरता आली. त्यासाठी केंद्राशी सतत संपर्कात आहोत. याशिवाय खासगी अंडीपूंज निर्मितीला प्रोत्साहन, कर्नाटकातून दर्जेदार अंडीपूंज लवकरात लवकर उपलब्ध कसे होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - दिलीप हाके, सहायक संचालक, रेशीम, मराठवाडा, औरंगाबाद.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

    Rural Story : जागरण

    Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

    Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

    Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

    SCROLL FOR NEXT