Shivjayanti
Shivjayanti  
मुख्य बातम्या

शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळा

टीम अॅग्रोवन

पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती सोहळा मुख्य सोहळा शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळी बुधवारी (ता. १९) होणार आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे या सोहळ्याचे प्रमुख उपस्थितीत. याप्रसंगी विविध मंत्र्यांसह राज्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.  तारखेनुसार होणाऱ्या या शिवजयंती सोहळ्यास पालकमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री संजय राठोड, उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदि उपस्थित राहणार आहेत.  पुण्याचे महसूल विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवाची महापूजा सकाळी ६ वाजता होणार आहे. यानंतर पालखी सोहळा होणार असून, सकाळी साडेनऊ वाजता शिवजन्मस्थानात पारंपरिक शिवजन्माचा पाळणा सोहळा होणार आहे. यानंतर शिवकुंज इमारतीमधील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर अभिवादन करणार आहेत. तेजुर येथील ठाकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ढोल पथक आदिवासी डांगी नृत्य, पारपंरिक मर्दानी खेळ यांचे सादरीकरण होणार आहे. यानंतर शिवनेरी विकास प्रकल्पाच्या पाहणीनंतर, जुन्नर शहरात शिवप्रेमींच्या मेळाव्याला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT