Shivbhun plate menu fixed
Shivbhun plate menu fixed 
मुख्य बातम्या

शिवभोजन थाळीतील मेनू निश्चित

टीम अॅग्रोवन

नगर ः शहरातील मंजूर केलेल्या शिवभोजन केंद्रांवर वारंवार तपासणी केली असता, गरजूंना वांगी, बटाटा भाजीशिवाय थाळी दिली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. गरिबांना सर्व पौष्टिक भाज्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी केंद्रचालकांना आठ दिवसांच्या जाहीर केलेल्या मेन्यूप्रमाणेच शिवभोजन थाळीत भाजी देण्याचे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून संगण्यात आले. 

सामान्य, गरिब नागरिकांना जेवण मिळावे यासाठी, यासाठी सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. २६ जानेवारीला योजनेस प्रत्यक्ष प्रारंभ झाला. नगर शहरात पाच केंद्रांत सातशे थाळ्यांना मंजुरी दिली. त्यानंतर नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी पाच केंद्रांना मंजुरी दिली. सध्या शहरातील महत्त्वाच्या शिवभोजन दहा केंद्रांतून चौदाशे थाळ्या दिल्या जात आहेत. आता शिवभोजन केंद्रांतून दिल्या जाणाऱ्या भोजनातील दैनंदिन भाज्यांचा मेन्यू निश्‍चित करण्यात आला. त्यानुसार शिवभोजनाच्या लाभार्थींना दिल्या जाणाऱ्या थाळ्यात कोणत्या दिवशी कोणता मेनू असावे हे निश्चित करण्यात आले आहे. थाळ्यात आता कडधान्य, वेलवर्गीय व पालेभाज्यांचा आस्वाद घेता येणार आहे. मागील पावणेदोन महिन्यांपासून सुरू असलेल्या योजनेत नगर जिल्ह्याने सुरवातीपासूनच आघाडी घेतली आहे. केंद्रचालकांना आठ दिवसांच्या जाहीर केलेल्या मेन्यूप्रमाणेच शिवभोजन थाळीत भाजी देण्याचे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून संगण्यात आले. 

सीसीटीव्हीचा ‘वॉच’  केंद्रचालकांना आठवड्याचा मेन्यू दिला आहे. त्याचपद्धतीने वाराप्रमाणे भाजी द्यावी लागणार आहे. नेमून दिलेल्या आठवड्याच्या भाजीपाल्याचे सूचना फलक लावणे बंधनकारक असून, सीसीटीव्ही बसविण्याचेही निर्देश देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे.

असा राहील मेन्यू  सोमवार ः मेथी, शेपू, पालक, करडई  मंगळवार ः भोपळा, दोडकी, घोसाळी, पडवळ  बुधवार ः मोडाची मटकी, चवळी, हरभरा, मूग, वाटाणा  गुरुवार ः कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, भेंडी, बटाटा  शुक्रवार ः मेथी, शेपू, पालक, करडई  शनिवार ः शेवगा, वाल, घेवडा, गवार  रविवार ः मोडाची मटकी, चवळी, हरभरा, मूग, वाटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT