शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ Shivayogi Siddharmeshwar Yatra begins with anointing
शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ Shivayogi Siddharmeshwar Yatra begins with anointing 
मुख्य बातम्या

शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ 

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेला ६८ लिंगाच्या तैलाभिषेकाने मंगळवारी (ता.१२) (यणीमज्जन) प्रारंभ झाला. पण कोरोनामुळे यंदा यात्रेतील नंदिध्वज मिरवणूक रद्द करण्यात आली. तसेच धार्मिक विधीही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला.  ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुमारे साडेनऊशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. मानाचे सातही नंदिध्वज हे योग दंडाचे प्रतीक आहेत. पहिला नंदिध्वज हिरेहब्बू वाड्यात असून, देवस्थानचा आहे तर दुसरा नंदिध्वज कसब्यातील देशमुखांचा आहे. कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख यांच्या हस्ते नंदिध्वजांची विधिवत पूजा करण्यात आली. या वेळी मानकरी आमदार विजयकुमार देशमुख, विश्वस्त चिदानंद वनारोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, किरण देशमुख यांच्यासह सुदेश देशमुख, सुधीर देशमुख उपस्थित होते. त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तामध्ये प्रमुख मानकरी व योगदंड घेऊन बग्गीतून ६८ लिंगाच्या तैलाभिषेक करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरातील अमृतलिंगाजवळ आल्यानंतर तैलाभिषेक करण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT