cotton
cotton  
मुख्य बातम्या

कापूस खरेदीच्या मुद्यावर शेतकरी संघटना उच्च न्यायालयात 

टीम अॅग्रोवन

नागपूर ः नियमानुसार एफएक्‍यु ग्रेडमधीलच मध्यम आणि आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी करण्याचे आदेश सीसीआयला देण्यात यावे, अशी मागणी करणारी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. कोरोनामुळे ई-फायलींग करण्यात आलेल्या या याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यमातून सुनावण होणार आहे.  कापसात मध्यम लांब धागा, मध्यम लांब धागा आणि मध्यम धागा असे तीन ग्रेड राहतात. एफएक्‍यु दर्जाची खरेदी करताना या तीन ग्रेडनुसार केली जाते आणि त्याकरीता दरही केंद्र सरकारच्या अखत्यारितील वस्त्रोद्योग खात्याकडून निश्‍चीत होतात. देश आणि राज्यात मात्र सद्यस्थितीत सीसीआयकडून लांब आणि मध्यम लांब धाग्याच्याच कापसाची खरेदी केली जात आहे. एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाचा म्हणजेच मध्यम धाग्याच्य कापसाच्या खरेदीप्रती सीसीआयची उदासिनता होती. सीसीआयने एफएक्‍यु श्रेणीतील तीनही दर्जाच्या कापसाची खरेदी करावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.  त्यासोबतच देश आणि राज्यात उत्पादीत सर्वच प्रतीच्या कापसासाठी दर जाहिर करण्याचे धोरण असावे आणि त्यानुसारच हंगामात शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करुन त्याला भाव मिळावा, असेही शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी संघटनेकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचीका दाखल करण्यात आली आहे. ॲड. सतिश बोरुळकर हे संघटनेची बाजू मांडतील.  प्रतिक्रिया तीन ग्रेडमध्ये कापसाची खरेदी व्हावी, अशी आमची मागणी आहे. सरकार मात्र मध्यम दर्जाच्या शेतमालाचेच भाव जाहिर करुन खरेदी करते. चांगल्या आणि तिसऱ्या प्रतीच्या शेतमालाचा विचारच सरकारकडून होत नाही. खरेदीच्यावेळी मात्र चांगल्या प्रतीच्या कापसासाठी मध्यम दर्जाच्या शेतमालाचेच दर लावले जातात. ही फसवणूक असल्याने याविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे.  - मधुसूदन हरणे, शेतकरी संघटनेचे नेते, वर्धा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT