Jalgaon
Jalgaon  
मुख्य बातम्या

अडीच कोटी उलाढाल करणाऱ्या शेतकरी कंपनीची सूत्रे ‘तिच्या’ हाती 

Chandrakant Jadhav

जळगाव ः वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण उलाढाल असलेल्या चांगदेव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची सूत्रे आरती राजेंद्र चौधरी या समर्थपणे राबवीत आहे. कंपनीने प्रक्रिया, बीजोत्पादन, कृषी निविष्ठा यासंबंधीच्या कामात उभारीदेखील घेतली आहे. 

आरती या कलाशाखेतील पदवीधर आहेत. वडील वकील. सासरी पतीदेखील वकील. सासरी ८५ एकर जमीन आहे. या शेतीसाठी पती राजेंद्र यांनी वकिली सोडली. शेतीचे व्यवस्थापन ते सांभाळू लागले. आपल्या कुटुंबात शेतीचे धडे मिळाल्याने आरतीताईदेखील शेतीचे व्यवस्थापन सांभाळू लागल्या. त्यात महिला मजुरांचे व्यवस्थापन, मजुरीच्या निधीचा ताळेबंद ठेवणे आदी कामे त्या करू लागल्या. केळी, कापूस, हळद, पपई आदी पिके शेतात घेतली जातात. शेतीची गोडी लागल्याने आपणही छोटा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, अशी कल्पना आरतीताईंना सुचली. पुणे, मुंबईत त्यांचे नातेवाईक असतात. त्यांच्याकडून दर्जेदार हळदीची मागणी असायची. ही बाब लक्षात घेता आपल्या शेतात पिकविलेल्या हळदीची पूडनिर्मिती सुरू केली. पुढे तापी पूर्णा महिला बचत गट स्थापन केला. महिलांच्या कार्यक्रमात त्या सक्रिय झाल्या. महिलांचे एकत्रीकरण सुरू केले. 

हळद पूडनिर्मितीची यंत्रणा त्यांना अनुदानावर कृषी विभागाने दिली. दरवर्षी दीड क्विंटल हळद पूडनिर्मिती व विक्री करतात. पुणे येथील मैत्रीण अनिता पाटील व मुंबई येथे कन्या अमरिता पाटील यांच्याकडे पूड पाठवितात. पुढे या दोघी हळद विक्रीचे व्यवस्थापन सांभाळतात. हळदीला गेली दोन वर्षे सरासरी २०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला आहे. मुलगा अंकुश हा अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील पदवीधर आहे. त्यालाही शेतीचे व्यवस्थापन सांभाळण्यासंबंधी आरतीताईंनी तयार केले आहे. हा प्रवास पुढे सुरूच राहिला. अशातून गावात २३६ शेतकरी सभासद असलेल्या संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली. या कंपनीचे अध्यक्षपदही आरतीताईंकडे संचालक मंडळाने सोपविले. ११ संचालक या कंपनीत आहेत. ही कंपनी मका ड्रायर, गोदाम, हरभरा बीजोत्पादन, कृषी निविष्ठा विक्री आदी उपक्रम, कार्यक्रम राबविते. 

समर्थपणे उचलली जबाबदारी  सुरुवातीला उलाढाल कमी होती. गेल्या तीन वर्षांत उलाढाल दोन कोटींवर पोचली. गेल्या वर्षी दोन कोटी ६१ लाखांची उलाढाल झाली. या कंपनीचे कामही आरतीताई समर्थपणे पाहत आहे. पती राजेंद्र यांची समर्थ साथ आहे. हळद प्रक्रिया उद्योग पुढे आणखी वाढवायचा त्यांचा मनोदय आहे. महिलांचा सहभाग वाढवून शेतीसाठी नवोपक्रम राबविण्याची तयारी करीत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT