दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार 
मुख्य बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण कृषिमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी आणि अन्नधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारकडे विनंती करणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे दुष्काळी स्थितीच्या पाहणीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री. पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल बागल, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, महारुद्र पाटील, ॲड. कृष्णाजी यादव यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने माऊली भोसले यांनी गावाला लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याचे टॅंकर वाढविण्याची व पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली. तसेच, खडकवासला कालव्याच्या पाण्यासंदर्भातील येणाऱ्या अडचणी सांगितल्या. या वेळी महादेव सूर्यवंशी, हनुमंतराव वाबळे, रवी पवार, विक्रम झगडे यांनीदेखील यासंदर्भातील आपली मते व्यक्त केली.यावर श्री. पवार यांनी टॅंकरच्या खेपा वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासला कालव्याच्या शेती सिंचनाच्या पाण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीची तसेच काय उपाययोजना करता येतील, याविषयीची माहिती श्री. पवार यांना दिली. यावरदेखील आपण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करू, असे आश्‍वासन श्री. पवार यांनी या वेळी दिले.

 चारा छावण्या सुरू करण्याची सूचना इंदापूर तालुक्‍यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या आणि बाजार समितीच्या माध्यमातून सर्वांना मध्यवर्ती पडेल अशा जवळपास साठ ते आठ ठिकाणी पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची सूचना यासंबंधी प्रमुखांना श्री. पवार यांनी दिल्या. यावर श्री. भरणे यांनी तत्काळ या चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या.   ‘भरणे आणि पाटील असल्यावर मताधिक्य मिळणारच’ बारामतीबरोबरच इंदापूर तालुक्‍याने सुप्रिया सुळे यांना दिलेल्या मताधिक्‍याबद्दल तालुक्‍याचे कौतुक आहे. आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असल्यावर मतधिक्‍य मिळणारच, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोघांचे कौतुक केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT