शरद पवार
शरद पवार  
मुख्य बातम्या

सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेः शरद पवार

टीम अॅग्रोवन

नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे. त्यामुळे काळ्या आईचे इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ईडीची नोटीस आली होती. लफडी केली असतील, म्हणूनच ईडीचा ससेमिरा लागला. विकासाच्या नावाखाली सत्तेच्या लालसेपोटी पक्षबदल करणाऱ्यांचा जनता बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शनिवारी मेळावा झाला. पक्षाचे निरीक्षक दिलीप वळसे, अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, राहुल जगताप, प्रसाद तनपुरे, अविनाश आदिक, नरेंद्र घुले, डॉ. सर्जेराव निमसे, निर्मला मालपाणी आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पवार म्हणाले, की अधिकाऱ्यांना कानमंत्र देऊन सरकारने छावण्या बंद केल्या. शेतकऱ्यांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात दुष्काळ, महापुरासारखी संकटे असताना सत्ता द्या म्हणत गावभर हिंडत राहिले. उद्योगधंदे बंद पडत असल्याने हाताला काम नाही. ही स्थिती जर बदलायची असेल, तर सामूहिक शक्तीबरोबर घेऊन महाराष्ट्राचा चेहरा बदलूया. सरकारने कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. मागील पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पदवीधर युवकांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नसल्याने लग्न होत नाही. मात्र, युतीचे सरकार बोलण्यातच पटाईत आहे.  ‘‘सत्ताधाऱ्यांनी उद्योगांच्या कर्जासाठी बॅंकांना ८७ हजार कोटींचा पुरवठा केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, उद्योगांना कर्ज देऊ, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही? दोन वेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांनी तुमचे काय घोडे मारले आहे? काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द केले, हे चांगले झाले. त्याबद्दल अभिनंदन...! मात्र, ३७१ कलम देशातील मिझोराम, नागालॅंड, हिमाचलसारख्या आठ राज्यांत लागू आहे. त्या कलमाचे काय?  गडकोट किल्ले विकसित करण्यासाठी तेथे सरकारने हॉटेल, बार सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील किल्ले हे स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास सांगणारे प्रतीक आहेत. ज्या किल्ल्यात स्वाभिमानासाठी तलवारी चमकल्या होत्या, तेथे आता हॉटेल, बार सुरू करून सरकार छमछम वाजवणार असल्याची टीका पवार यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT