शरद पवार
शरद पवार  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांप्रती आस्था नसणाऱ्या शासनामुळे आत्महत्या वाढल्या: शरद पवार

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः देशात सत्तेत असलेल्यांमध्ये शेतकऱ्यांप्रती आस्था नाही. अशा प्रकारच्या सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नरेंद्र मोदींना निवडणूक हरल्यानंतर चौकीदाराचेच काम देऊ, अशी कोपरखळीही त्यांनी केली. बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक, डॉ. राजेंद्र शिंगणे, रविकांत तुपकर, जोगेंद्र कवाडे व इतर नेते उपस्थित होते. देशातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण काँग्रेस कार्यकाळात योजना आणल्या. शेतकऱ्यांना तेव्हा सरसकट कर्जमाफी केली. आता जर आम्ही सत्तेत आलो, तर सरसकट कर्जमाफी देऊ. तसेच, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले.  भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, भाजपकडून जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्जिकल स्ट्राइकचा वापर राजकीय स्वार्थासाठी करीत आहेत. पाकिस्तानच्या कैदेत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका ही ५६ इंचाच्या छातीमुळे नव्हे, तर जागतिक स्तरावरून पाकिस्तानवर आलेल्या दबावामुळे झाली. खरोखरच मोदी यांचा एवढा प्रभाव असेल, तर त्यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण यांची सुटका करून दाखवावी, असे आव्हानसुद्धा या वेळी पवार यांनी मोदींना दिले. सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी देशात निर्माण झालेले अस्थिर वातावरण, सामाजिक एकता, अखंडतेबाबत चिंता व्यक्त केली. देशहितासाठी आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी मतदारांना या ठिकाणी केले. सभेला जिल्हाभरातून हजारोंची गर्दी उसळली  होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT