जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌घाटन
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌घाटन 
मुख्य बातम्या

जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌घाटन

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. २१) राज्यातील पहिली प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष खरेदीची बाजारपेठेचे उद्‌घाटन केले जाणार आहे. याच दिवशी व्यापारी व अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन बाजारपेठ सक्षमरित्या चालविण्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधांवर चर्चा व निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली.  जालना बाजार समितीच्या आवारातच रेशीम कोष खरेदीसाठी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जाणाऱ्या या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत कोष ठेवण्यासाठी जागा व प्रसंगी व्यापाऱ्यांना राहण्याची सोय, रेशीम कोष उत्पादकनांही आवश्‍यक सुविधा, इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर वजन, कोषांचे ग्रेडशन, चोवीस तासांत विकलेल्या कोषाचे पैसे मिळण्याची सोय या बाजारपेठेत असणार आहे. रामनगरमसह इतरही रेशीम मार्केटमध्ये असलेल्या सुविधा व त्या तुलनेत आवश्‍यक असणाऱ्या सुविधा याचाही अभ्यास व त्यादृष्टीने पावले उचलली जावीत म्हणून शनिवारी उद्‌घाटन सत्राबरोबरच दुपारी कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आलेल्या ४५ कोष खरेदीदारांशी त्यांना आवश्‍यक सोयीसुविधांबाबत अधिकारी चर्चा करणार आहेत. राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जालन्यातील रेशीम कोष बाजारपेठेचे उद्‌घाटन होणार आहे. जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, या वेळी खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, वस्त्रोद्योगचे प्रधान सचिव अतुल पाटणी, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, रेशीम संचालनालयाचे संचालक  संजय कदम, रामनगरम रेशीम बाजारपेठेचे उपसंचालक जे. एन. मुन्शी, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, सर्व आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT