खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात विक्री
खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात विक्री  
मुख्य बातम्या

खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात विक्री

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय केंद्रांची संख्या वाढण्याची प्रतीक्षा असून, आजघडीला फक्त चारच केंद्र सुरू आहेत. सोयाबीनची तीन केंद्रांमध्ये खरेदी सुरू असून, कुठेही सोयाबीनची आवक झालेली नसल्याची माहिती मिळाली.

१ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात उडीद, मूग व सोयाबीन खरेदी सुरू झाली. ही खरेदी फक्त अमळनेर, पाचोरा व जळगाव येथे सुरू आहे. सर्व १५ तालुक्‍यांसह शेंदूर्णी (ता. जामनेर) येथे ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे, परंतु अजून फक्त रावेर, जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे ज्वारीची खरेदी सुरू आहे.

मक्‍याची खरेदी अल्प असून, सर्व चार केंद्रांवर मिळून ३० क्विंटल खरेदी झाली आहे. ज्वारीची ५०० क्विंटल खरेदी झाली. ज्वारीला २४३०, मक्‍याला १७०० रुपये हमीभाव आहे. उडदाला ५६००, मुगाला ६९७५ आणि सोयाबीनला ३३९९ रुपये प्रतिक्विंटलचे दर हमीभावानुसार आहेत.  सोयाबीनचे उत्पादन कमी होते. यातच मागील महिनाभरापासून बाजारात सोयाबीनला कमाल ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात सोयाबीनची विक्री टाळली आहे. यामुळे सोयाबीनची कुठलीही आवक कुठल्याच केंद्रात झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

गोदामांच्या उपलब्धतेनुसार केंद्र वाढणार ज्वारी व मका खरेदीसंबंधी १६ पैकी चारच केंद्र सुरू आहेत. उर्वरित केंद्र जसे तहसीलदार कार्यालयाकडून गोदाम उपलब्ध होईल, तसे सुरू केले जातील. यानंतर जिल्ह्यात ज्वारी खरेदी केंद्रांची संख्या वाढेल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT