iihr
iihr  
मुख्य बातम्या

‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन 

टीम अॅग्रोवन

नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर)  फळे, भाजीपाला व फुलांच्या नवीन जातींचे विकसित केलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन  विक्री पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकनिहाय जाती निवडून बियाणे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘आयआयएचआर’ ही संस्था प्रामुख्याने फळे, भाजीपाला व फूल पिकांवर संशोधन करूनअधिक उत्पादनक्षम जाती विकसित करत असते. संस्थेने विकसित केलेल्या जातींमुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादकतेमध्ये वाढ दिसून आली आहे. संस्थेने शेतकऱ्यांसाठी पोर्टलवर बाराहून अधिक पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे.  शेतकऱ्यांना थेट संस्थेकडून बियाणे उपलब्ध करून देणे हा पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या कामात विलंब होऊ शकतो, असे अगोदर सूचित करण्यात आले असून बियाणे खरेदीत अडचण आल्यास पैसे परताव्याचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी करा ऑनलाइन बियाणे खरेदी

  • seed.iihr.res.in या पोर्टलवर भेट द्या.
  • मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून नोंदणी करा.
  • पोर्टलवर पीकनिहाय जातींच्या वैशिष्ट्यांसहित माहिती.
  • खरेदी करताना वजन व त्यानुसार किंमती विषयी माहिती.
  • पिकांच्या जातीनिहाय बियाणे उपलब्ध असेपर्यंत पुरवठा.
  • जातींची राज्यनिहाय शिफारस.
  • पीक उपलब्ध जाती
    टोमॅटो अर्का सम्राट, अर्का रक्षक, अर्का अपेक्षा
    भेंडी  अर्का निकिता
    वांगी अर्का केशव
    मिरची  अर्का अभीर
    संकरित मिरची अर्का ख्याती, अर्का मेघना, अर्का श्वेता, अर्का हरिता
    ढोबळी मिरची  अर्का मोहिनी, अर्का गौरव, अर्का अतुल्य
    कलिंगड   अर्का माणिक
    चवळी    अर्का मंगला 
    कुयरी शेंग   अर्का मुकुणा
    खरबूज     अर्का जीत, अर्का सिरी
    पालक अर्का अनुपमा
    कोथिंबीर   अर्का इशा
    झेंडू   अर्का परी
    पपई   अर्का सूर्या, अर्का प्रभात
    सिड कीट भाजीपाला बियाणे, फुलांचे बियाणे, परसबाग कीट

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT