black rice
black rice  
मुख्य बातम्या

‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरु

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात रानटी वाण म्हणून गणलेल्या ‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरु आहे. या भाताचे टरफल वरुन पांढऱ्या रंगाचे असून आतील तांदूळ काळ्या रंगाचा व बारीक आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणारा, चविष्ट असा हा काळा तांदूळ दोन वर्षांत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. ‘ब्लॅक राइस’ हे रानटी वाण म्हणून दुर्लक्षित होते. आसाममधून हे वाण उपलब्ध करण्यात आले असून ते जाड दाण्याचे व आतून बाहेरून काळ्या रंगाचे आहे. शेतात ते खूप उंच वाढते. त्याचा दाणा लांब असून जमिनीवर लोळणारी जात आहे. कोकणात याचा उपयोग करुन घेण्यासाठी संशोधन केंद्राने प्रक्रिया, प्रयोग करुन वरुन सफेद भातासारखे व आतमध्ये काळ्या रंगाचे बारीक बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये जेनरेटिक व्हेरिएशन करण्याचे काम सुरू आहे. कोकणात कमी उंची, बारीक तांदूळ असलेल्या भाताला मागणी वाढेल अशी अपेक्षा असल्यामुळे शिरगाव येथील भातसंशोधन केंद्रात प्रयोग सुरु आहे. लाल-भात बियाणे आणि ब्लॅक राईस यांच्यात तसेच साम्य आहे. न्युट्रीशियन, आर्यन, फायबर, झींग तसेच मानवाच्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढविण्याची जास्त क्षमता ब्लॅक राईसमध्ये जास्त आहे. प्रथिनामुळे बियाण्यात रंग प्राप्त होतो. गेल्या वर्षभरापासून यावर संशोधन सुरु आहे. केंद्राच्या शेतावर भात लावणीपासून ते त्यांचा जेनरेटीक व्हेरिएशन बदल करण्याचे काम सुरु आहे.  या सर्व कामात संशोधन केंद्राचे तज्ज्ञ व कर्मचारी सक्रिय सहभागी आहेत. बारीक दाण्याचा ब्लॅक राइसचे बियाणे शेतकऱ्यांना दोन वर्षात उपलब्ध होईल. या बियाण्यावर अद्यापही संशोधन सुरु असल्याचे डॉ. वाघमोडे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT