संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगरमध्ये ३७०० हेक्टर क्षेत्रावर होणार बीजोत्पादन

टीम अॅग्रोवन

नगर  ः यंदाच्या खरिपात महाबीजतर्फे बाजरी, तूर, उडीद, ज्यूट, सोयाबीन यांसह पहिल्यांदाच नागली, कारळे, भगरीचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. साधारण ३७०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेतले जाणार असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सी. के. देशमुख यांनी दिली. 

महाबीजतर्फे बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. यंदा नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, शेवगाव, जामखेड सह अन्य तालुक्यांतही बीजोत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. महाबीजतर्फे बाजार भावानुसार सुधारित बियाणे पुरवली जातील. उत्पादित पात्र मालाची बाजारभावापेक्षा २० ते २५ टक्के वाढीव दराने महाबीज खरेदी करणार आहे. एका गावात किमान २५ एकर क्षेत्रावर बीजोत्पादन घेणे गरजेचे आहे. तपासणीसाठी एकरी दीडशे रुपये शुल्क आकारले जाते. मात्र २०० एकरांपेक्षा जास्ती क्षेत्र असलेल्या गावांत मोफत बियाणे तपासणी केली जाणार आहे. महाबीजने बीजोत्पादनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अग्रीम योजना राबवली आहे. शंभर रुपये भरून आगाऊ बुकिंग करता येत आहे. यंदा पहिल्यांदाच नागली, कारळे, भगरीचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सी. के. देशमुख व उपव्यवस्थापन सुनील दौंड यांनी दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यात सहभागी व्हावे, असे अवाहन त्यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT