बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा सदस्यांना संबोधित 
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा सदस्यांना संबोधित  
मुख्य बातम्या

बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा सदस्यांना उद्या संबोधित 

शांताराम काळे 

अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना करणाऱ्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे या लोकसभा सदस्यांना ऑनलाइन संबोधित करणार आहेत. आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उद्या (ता.१९) दुपारी १२.४५ वाजता सांगणार आहेत. 

लोकसभा पोर्टल व चॅनेलवर हे संबोधन दाखवले जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर सीमा कौल सिंह यांनी दिली आहे. आजपर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या व जगभर बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावातील राहीबाई यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली बीज बँक आपल्या छोट्याशा झोपडीत बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाने सुरू केली होती. 

राहीबाई यांचा प्रवास सातत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी बीजनिर्मिती व वितरण करून सुरू आहे. त्यासाठी बायफ संस्थेच्या मदतीने कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून त्यामार्फत राज्य आणि देश पातळीवरील बीजसंवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित राहीबाई यांनी आपले जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सदस्यांना त्या काय मार्गदर्शन करणार आहेत हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

बायफ संस्थेने सुरू केलेल्या देशी बीजसंवर्धन उपक्रमाची दखल देश आणि विदेशातही घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात देशी बियाण्यांच्या बँका शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करत आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये बायफ संस्थेच्या वतीने विषय तज्ज्ञ संजय पाटील व विभागीय अधिकारी जितीन साठे हे सौ. पोपेरे यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chara Chawani : सोलापुरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

Fodder Shortage : वागद शिवारात गोधन चाऱ्याअभावी विक्रीला

Orchard Fire : दहा एकरांतील आंबा, काजू बाग जळाली

Water Conservation : विहीर, आडांच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले दहा गावांचे विद्यार्थी

Farmer Movement : ‘नांदूर मधमेश्वर’चा प्रश्न पेटला

SCROLL FOR NEXT