अंदरसुल, ता. येवला : येथील परिसरात उन्हाळी कांदा लागवडीमध्ये दिसून आलेला जिवाणूजन्य रोग.
अंदरसुल, ता. येवला : येथील परिसरात उन्हाळी कांदा लागवडीमध्ये दिसून आलेला जिवाणूजन्य रोग.  
मुख्य बातम्या

कांद्यावरील किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांकडून जनजागृती

टीम अॅग्रोवन

नाशिक : धुके, ढगाळ वातावरण व तापमान बदल अशा परिस्थितीत कांदा पिकांवर जीवाणूजन्य, बुरशीजन्य रोग व फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशावेळी किडी-रोगांवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या तज्ज्ञांनी (एनएचआरडीएफ) जिल्ह्यातील थेट प्रक्षेत्रांची पाहणी करून उपाययोजना करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या वेळी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे सहाय्यक संचालक डॉ. आर. सी. गुप्ता, पीक संरक्षण विभागाचे तांत्रिक अधिकारी मनोजकुमार पांडे, कीटकशास्त्र विभागाचे तांत्रिक अधिकारी मनोजकुमार पाठक यांनी निफाड व येवला तालुक्यातील कांदा लागवडीची पाहणी केली. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे जिवाणूजन्य सड हा प्रादुर्भाव दिसून आला. तर निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी जांभळा करपा व तपकिरी रंगाचा करपा प्रादुर्भाव उन्हाळी कांद्यावर दिसून आला.  याबाबत उपाययोजना म्हणून वातावरण निवळल्यानंतर खुरपणी करून तण नियंत्रण करावे. आंतर मशागत करून जमीन भुसभुशीत करून हवा खेळती ठेवण्यासाठी योजना आखावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. किडी-रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारण्या कराव्यात. अधिक तांत्रिक मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान, चितेगाव फाटा, (ता. निफाड) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. आर. सी. गुप्ता यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT