कोल्हापूर जिल्ह्यात तलावांत समाधानकारक पाणीसाठा
कोल्हापूर जिल्ह्यात तलावांत समाधानकारक पाणीसाठा 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात तलावांत समाधानकारक पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २८) दुपारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पश्‍चिम भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा नद्यांचे पाणी दुथडी भरून वाहू लागले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात रविवार दुपारपर्यंत सुमारे तीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, बालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडेली, चावरे, मांगलेसावर्डे, काखे, तांदुळवाडी, शिरगाव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव व पाटणे. असे एकूण ३० बंधारे पाण्याखाली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी हवामान असल्याने याचा लाभ खरीप पिकांना होणार आहे. अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने खरीप पिके जोमात वाढण्याची शक्‍यता आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तुालक्‍यात सर्वाधिक ७९ मिलिमीटर पाऊस झाला. भुदरगड, चंदगड आजऱ्यात सरासरी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या राधानगरी धरणात ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही धरणक्षेत्रात चांगला पाऊस असल्याने येत्या चार दिवसांत धरणातील पाणीसाठा नव्वद टक्केच्या वर जाण्याची शक्‍यता आहे. राधानगरी धरणात आज अखेर ७.११ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. नजिकच्या कोयना धरणात ६२.४१ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ११८.७२७ इतका पाणीसाठा आहे. शिरोळ तालुक्‍यातील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात यंदाच्या हंगामात दुसऱ्यांचा पाणी आले. यामुळे दत्त मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. 

विविध तलावांत  समाधानकारक पाणीसाठा  दमदार पावसामुळे आळते, बिरदेववाडी आणि लक्ष्मीवाडी गावांसाठी संजीवनी ठरलेला लक्ष्मीवाडी (ता. हातकणंगले) येथील पाझर तलाव तुडंब भरल्याने सांडव्यातून पाणी बाहर पडले आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दरम्यान भरणारा तलाव यंदा तीन महिने आधीच ओव्हर फ्लो झाल्याने नागरिकांचा आनंदही ओसंडून वाहत आहे. या तलावातून जवळपास १८ ते २० हजार लोकांची तहान भागवली जाते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT