Satara Zilla Parishad will provide assistance to farmers for agricultural pumps
Satara Zilla Parishad will provide assistance to farmers for agricultural pumps 
मुख्य बातम्या

सातारा जिल्हा परिषदेकडून शेतीपंपासाठी मदत

हेमंत पवार

कऱ्हाड, जि. सातारा  ः जिल्ह्यात जुलै -ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसाने धरणातील पाणी पातळीत वाढ होऊन महापूर आला. त्याचा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिके, शेतजमिनी सोबत शेती पंपाच्या मोटारीही वाहून गेल्या. अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने उभारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत वीजपंप किमतीच्या ९५ टक्के किंवा २० हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यातील २३७ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असून कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील सर्वाधिक शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचा कृषी विभाग धावून आला आहे. 

अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पावसाने यावर्षी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जुलै -ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहिली. त्यात अतोनात नुकसान झाले. 

जिल्हा परिषदेच्या २०१९ - २० च्या सेसमधून नवीन वीजपंप खरेदी करण्यासाठी तरतूद करण्यात आली. त्यासाठी सुमारे २५० लाभार्थी गृहित धरून ५० लाख मदतीची तरतूद केली. तीन, पाच व साडेसात अश्‍वशक्तीच्या आएसआय प्रमाणित वीज मोटारी खरेदी करता येणार आहेत. मोटारीच्या किमतीच्या ९५ टक्के किंवा २० हजार यांपैकी कमी असणारे अनुदान शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून पंचायत समितीमार्फत त्याचा सर्व्हे करण्यात आला. यातील कऱ्हाड पंचायत समितीने कळवलेल्या पैकी १०९ लाभार्थ्यांची निवड झाली. कऱ्हाड व पाटण तालुक्‍याला पुराचा फटका सर्वाधिक बसल्याने या योजनेत या दोन तालुक्‍यांतील लाभार्थ्यांचा अधिक समावेश आहे. 

अशी होईल कार्यवाही... ज्या शेतकऱ्यांना याअंतर्गत लाभ मिळणार आहे त्या लाभार्थ्यांनी खेरदी केलेल्या मोटारीचे बील दोन प्रतीत घ्यायचे आहे. त्यातील एक बिल व आवश्‍यक कागदपत्र पंचायत समितीच्या कृषी विभागात द्यायची आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून वस्तू खरेदी व आवश्‍यक मानकांची खातरजमा केली जाणार आहे. त्याची तपासणी झाल्यावर कृषी अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांस अनुदान मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या शिफारशीद्वारे मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे शेती अधिकारी भूपाल कांबळे, संजय गोखले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT