gajanan maharaj palkhi
gajanan maharaj palkhi 
मुख्य बातम्या

संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

टीम अॅग्रोवन

शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (ता.१५) संत गजानन महाराज यांच्या १४२ व्या प्रगट दिनी लाखो भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या अलोट उपस्‍थित गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा झाला. शहरात सर्वत्र ‘गण गण गणात बोते’चा गजर सुरू होता. प्रगट दिनानिमित्त गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील दिंड्याचे शेगावमध्ये आगमन सुरू झाले होते. प्रगटदिन सोहळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व ब्रह्मवृंदाच्या उपस्थित अवभृतस्नान सकाळी १० वाजता झाले. यानंतर दुपारी २ वाजता श्रींच्या रजत मुखवट्यासह पालखी सोहळा निघाला. यात घोडे, हत्ती, सजवलेला रथ, मेणा, शेकडोच्या संख्येत भगवे पताकाधारी, राज्यभरातून आलेले वारकरी सहभागी झाले.  पालखी सोहळा मंदिर परिसर, जुने महादेव मंदिर परिसर, संत सावता चौक, तीन पुतळे, फुले नगर, तेलीपुरा, बंकट सदन, फरशीवेस, स्वामी विवेकानंद चौक, भैरव चौक, आठवडी बाजार, बसस्थानक मार्गे, महाराजा अग्रसेन चौक, शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक चौक, गांधी चौक, जुने मंदिर रोड मार्गे नगर परिक्रमाकरिता श्रींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला होता. सायंकाळी उशिरा पालखी मंदिरात परतली.  उत्सवाची उद्या सांगता रविवारी (ता. १६) सकाळी ७ ते ८ यावेळेत हरीभक्त परायण प्रमोदबुवा राहणे (पळशी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. यानंतर प्रगट दिन उत्सवाची सांगता होणार आहे. शनिवारी पालखीमार्गावर चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण केली. ठिकठिकाणी भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांची दालने उघडण्यात आली होती. विविध जाती-धर्माच्या लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT