संजय धोत्रे
संजय धोत्रे 
मुख्य बातम्या

शेतकरी केंद्रित काम करणारः संजय धोत्रे

टीम अॅग्रोवन

पुणे/अकोला : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद ही माझ्या दृष्टीने शेतकरी, कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. कृषी शिक्षणातील संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी शेतकरी व विद्यार्थीकेंद्रित काम करणार असून विद्यापीठांच्या कामकाजाला चालना देणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी सांगितले. विदर्भातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘‘वादविवाद आणि न्यायालयीन तंट्यामुळे कृषी परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीचा मुद्दा राज्य सरकारसाठी कळीचा बनला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार धोत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परिषदेवर ते पुढील तीन वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम बघतील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  उच्चशिक्षित खासदारांच्या यादीत नाव घेतले जात असलेले श्री. धोत्रे यांनी अकोल्याच्या पळसो बढे येथे प्राथमिक शिक्षण घेत पुणे विद्यापीठातून यंत्र अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते विधी पदवीधरदेखील असून केंद्रिय कृषिमंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. विद्यापीठे भरती मंडळाच्या अध्यक्षपदावर स्वतःच्या नियुक्ती करून घेण्याचा अजिबात अधिकार नाही, असा निर्वाळा राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिला आहे.  राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ तसेच कृषी शिक्षण व संशोधनात महत्त्वाची भूमिका असलेल्या कृषी परिषदेला गेल्या काही महिन्यांपासून उपाध्यक्ष नव्हता. त्यामुळे कृषी विद्यापीठांमधील भरतीदेखील रखडली आहे.  तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांच्या कारभारामुळे कृषी परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. खर्चे यांनी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाचे अध्यक्षपद कब्जात घेण्यासाठी स्वतःच्या स्वाक्षरीनेच मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतःची नेमणूक करून घेतली. हा मुद्दा गाजल्यामुळे खर्चे यांना मुदतवाढ मिळाली नाही.  ‘‘श्री. धोत्रे यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी किंवा राज्य शासनाची मर्जी असेल तोपर्यंत राहील. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या उपाध्यक्षासाठी शासनाने मंजूर केलेल्या सर्व सुविधा मिळतील,’’ असे कृषी खात्याचे सहसचिव दे. आ. गावडे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT