खत कंपन्यांची रेल्वे रेकसाठी कोल्हापूरऐवजी सांगलीला पसंती
खत कंपन्यांची रेल्वे रेकसाठी कोल्हापूरऐवजी सांगलीला पसंती 
मुख्य बातम्या

खत कंपन्यांची रेल्वे रेकसाठी कोल्हापूरऐवजी सांगलीला पसंती

Raj Chougule

कोल्हापूर : अनेक नामांकित खत कंपन्या कोल्हापुरातील रेल्वे धक्क्‍यावर (रेक) खते आणण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील विक्रेत्यांना खते मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कंपन्यांचा रेल्वेशी वाहतूक करार संपल्याचे कारण सांगून कंपन्या कोल्हापुरात खते आणत नाहीत. सांगलीत मात्र, मोठ्या प्रमाणात खते उतरविली जातात. तेथून कोल्हापुरात खते आणणे दिव्य ठरीत असून याचा नाहक भुर्दंड विक्रेत्यांवर बसत आहे. अपेक्षित खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही या पद्धतीचा मोठा फटका बसणार आहे.

सध्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडत अाहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांची शिवारे आता मशागतीला आली आहे. भाताचे प्रमाण जास्त असल्याने अनेक शेतकरी भांगलणीनंतर युरियासारख्या खताचा डोस देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे या कालावधीत युरियासारख्या खतांची मागणी वाढते. परंतु काही मोजक्‍या कंपन्या वगळता इतर कंपन्या मात्र कोल्हापुरात खते आणत असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे.

सांगलीत खते उपलब्ध अनेक कंपन्या सांगली येथे खते उतरवतात. तेथून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ या लगतच्या तालुक्‍यांतील काही गावांना खत पुरवठा होतो. परंतु जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील अन्य तालुक्‍यांना मात्र सांगलीतून खते आणण्याशिवाय पर्याय नसतो. शेतकऱ्यांना ज्या कंपनीची खते हवी असतात. ती खते उपलब्ध नसतात. जर गरज असेल तर ती खते सांगलीतून आणावी लागतात. यामुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. जर एखाद्या विक्रेत्याला एखादे खत हवे असेल तर जादा वाहतूक खर्च देऊन ती खते खरेदी करावी लागतात.

युरियाचे वाटप जाते कुठे? प्रत्येक कंपनी प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक प्रमाणात खतांचा पुरवठा करते. कंपन्यांकडे मागणी असूनही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्‍यक ती खते मिळत नाहीत. यामुळे कोल्हापूरसाठी असणारी खते कुठे जातात असा सवाल उपस्थित होते. जादा रक्कम मिळविण्यासाठी काही कंपन्यांचे प्रतिनिधी व वाहतूकदारांच्या साटेलोटे असल्याचीही चर्चा आहे.

कंपन्यांची दादागिरी जर कोल्हापुरात आमच्या कंपनीचा युरिया हवा असेल तर त्याबरोबर इतर खतेही घ्यावी लागतील, अशी सक्ती कंपन्यांकडून विक्रेत्यांना केली जात आहे. यामुळे विक्रत्यांची अवस्थाही अडचणीची झाली आहे. मागणी नसलेली खते कंपन्यांकडून घेऊन त्याचा उपयोग काय? असा सवाल विक्रेत्यांतून होत आहे.

पश्‍चिमेकडील तालुक्‍यांतील बिकट अवस्था गडहिंग्लज, आजरा, चंदगड राधानगरी, गगनबावडा आदी तालुक्‍यांतील हजारो हेक्‍टर क्षेत्रावर भाताचे पीक आहे. या पिकांना आता युरियाची गरज आहे. पण हव्या त्या कंपनीचा युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त आहे. विक्रेत्यांकडून रेकची अडचण सांगितली जात असल्याने शेतकऱ्यांना हव्या उपलब्ध असेल तो युरिया घ्यावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT