Sangli in fertilizer shops open; Police constraints
Sangli in fertilizer shops open; Police constraints 
मुख्य बातम्या

सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची अडवणूक

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी सेवा केंद्र सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत सुरू ठेवली आहेत. जिल्ह्यात एक ते दोन महिने पुरेल इतकी रासायनिक खते आणि औषधे शिल्लक आहेत. मात्र, काही ठिकाणी पोलिसांची अडवणूक होत असल्याने ग्रामीण भागात खते देण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्राच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात ‘कोरोना’च्या मुळे अनेक दुकाने बंद आहेत. मात्र, कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश कृषी मंत्री यांनी दिल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्र सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू रासायनिक खते घेऊन जात असताना काही ठिकाणी पोलिसांच्याकडून अडवणूक केली जात आहे. ही अडवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी कडक बंद असल्याने मुख्य शहरात असलेली दुकाने बंदच ठेवावी लागली आहेत. 

जिल्ह्यात पाच हजार मेट्रीक टन यूरिया शिल्लक आहे. तसेच इतर रासानियक खतांचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सांगितले आहे. काही दिवसांत द्राक्षाची खरड छाटणी सुरू होईल, त्याला खतांची आवश्यकता भासणार आहे. तसेच ऊस, भाजीपाला या पिकांना सातत्याने रासायनिक खते आणि औषधांची मागणी आहे. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या कृषी सेवा केंद्रांनी सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खते मिळत आहेत. सध्या रासायनिक खते आणि औषधे शासकीय गोदामात शिल्लक असली तरी, भविष्यात अपुरे पडू नये म्हणून खतांची मागणी केली असल्याचे संबंधित विभागाच्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक दुकानदार, डिलर्स यांच्याकडे पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांची बैठक घेऊन खतांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची अडवणूक करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. बसवराज मास्तोळी - जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, सांगली  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT