संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

राज्यात सुरू होणार साहिवाल प्रक्षेत्र संतती परीक्षण प्रकल्प

अमित गद्रे

पुणे ः राज्यातील साहिवाल गोवंशाचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांना नोंदणीकृत जातीवंत वळूंची रेतमात्रा, सॉर्टेड सिमेन उपलब्ध करून देण्याच्या बरोबरीने पशुपालकांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन वाढविण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि केंद्रीय गोवंश संशोधन संस्था, मेरठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात साहिवाल प्रक्षेत्र संतती परीक्षण प्रकल्पाला सुरवात होत असल्याची माहिती पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.

प्रकल्प केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, की चार वर्षांपूर्वी राज्यातील प्रयोगशील कृषी पदवीधर आणि पशुपालकांच्या सहकार्याने साहिवाल क्लब सुरू करण्यात आला. सध्या क्लबमध्ये १५० पशुपालक सहभागी असून, एक हजार साहिवाल गाईंचे संगोपन केले जाते. गटामध्ये सरासरी प्रतिदिन ८ ते १६ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या जातिवंत साहिवाल गाई आहेत. पशुपालकांच्या गोठ्यात जातिवंत उच्च दुधाळ वंशावळ तयार करण्यासाठी आम्हाला केंद्रीय गोवंश संशोधन संस्थेच्या माध्यमातून नोंदणीकृत जातिवंत वळूंच्या रेतमात्रा मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील पशुपालकांच्या गोठ्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून जातिवंत कालवडी, गाई तयार होतील.

प्रकल्पामध्ये सहयोगी शास्त्रज्ञ म्हणून पुणे कृषी महाविद्यालयातील डॉ. बाळासाहेब पाटील काम पाहतील. प्रकल्पाच्या उभारणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे आणि पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत फुलपगारे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.   पशुपालकांना देणार जातिवंत वळूंच्या रेतमात्रा भारतीय गाई काटक आहेत, त्यांची रोग प्रतिकारक्षमताही चांगली आहे. योग्य व्यवस्थापन ठेवले तर निश्चितपणे दुग्धोत्पादनात वाढ होते. हे लक्षात घेऊन राज्यात साहिवाल प्रक्षेत्र संतती परीक्षण प्रकल्पाला सुरवात करत आहोत. पशुपालकांपर्यंत नोंदणीकृत जातिवंत वळूंची रेतमात्रा, सॉर्टेड सिमेन तसेच भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गोवंश संशोधन संस्थेचे संचालक  डॉ. एन. व्ही. पाटील यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT