कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात साजरा करण्यात आला
कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात साजरा करण्यात आला 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : येथील ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी (ता. ८) विजयादशमी शाही थाटात आणि उत्साहात साजरी झाली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करून सोने लुटले. 

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे परंपरागत पद्धतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. या वेळी पोलिस बँड वाजविण्यात आला. दसरा महोत्सव समितीच्या वतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. तलाठी प्रल्हाद यादव यांनी शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण केले. पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा झाल्यानंतर कोल्हापूरकर जनतेने अपूर्व उत्साहात सोने लुटले. या वेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असताना नागरिकांनी त्यांना सोने देण्यासाठी धाव घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT