roses
roses 
मुख्य बातम्या

कोरोनामुळे उतरली गुलाबाची लाली 

गणेश कोरे

पुणे ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद झाल्या आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लग्नसराईत मागणी असलेल्या गुलाब फुलांची बाजारपेठ ठप्प झाल्याने फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात मावळ तालुका आणि तळेगाव येथील फ्लोरिकल्चर पार्कमधील फुलांना गेल्या आठवड्यापासून मागणी नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे एका आठवड्यात जवळपास सहा कोटींचे नुकसान झाले आहे.  व्हॅलेंटाइन डेनंतर गुलाबांना विशेष मागणी असलेला हंगाम म्हणजे लग्नसराई. देशभरात लग्नसराई सुरू झाल्यानंतर तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क आणि मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विविध रंगी गुलाबांना मागणी असते. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या फैलावापासून बचावासाठी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांमध्ये लग्न समारंभ रद्द करण्याबरोबरच सीमित स्वरूपात होत असल्याने गुलाब फुलांची मागणी घटली आहे. देशातील विविध बाजारपेठा बंद असल्यानेदेखील मागणी ठप्प झाली आहे.  याबाबत माहिती देताना तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कचे अध्यक्ष मल्हारराव ढोले म्हणाले, ‘‘व्हॅलेटाइन डेनंतरची काढणी झाल्यानंतर मार्च, एप्रिलमधील लग्न हंगामासाठीचा फ्लश सुरू होतो. सध्या हा फ्लश सुरू झाला असून, दररोज एकरी सुमारे २ हजार फुलांची काढणी होते. मात्र कोरोनामुळे देशभरातील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद झाल्याने पुरवठा थांबला आहे. व्हॅलेंटाइनला २० फुलांच्या गड्डाली २५० रुपये दर होता. तोच दर लग्न हंगामात ५० ते ६० रुपये असतो. मात्र आता बंदमुळे दरच नसल्याने फुले काढणीसाठी होणारा मजुरांचा खर्च टाळण्यासाठी फुले जागीच पिंच आणि स्टेम मोडले जात आहेत. यामुळे एकरी साधारण ५० हजार रुपयांचे नुकसान आठवड्याला होत आहे. पार्कमध्ये सुमारे २०० एकरवर पॉलिहाऊसमधून फुलांचे उत्पादन घेतले जात आहे.’’  पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यात सुमारे १ हजार २०० एकरवर पॉलिहाउसमधून गुलाबाचे उत्पादन घेतले जात आहे. ही फुले देशासह निर्यात केली जातात. सध्याचा फ्लश हा देशांतर्गत असून, एकरी साधारण २ हजार फुलांचे नियोजन असते. सध्या कोरोनामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प असल्याने सुमारे २५ लाख फुलांचा पुरवठा ठप्प झाला आहे, तर शीतगृहांमध्ये सुमारे ३० लाख फुलांचा साठा शिल्लक आहे. ही परिस्थिती कधी सुधारेल याबाबत आम्ही साशंक असल्याने नुकसान वाढीचा धोका आहे.  -----  दृष्टिक्षेपात गुलाब उत्पादन  मावळ, तळेगावातील क्षेत्र ः दीड हजार एकर  दैनंदिन एकरी उत्पादन ः सुमारे २ हजार फुले  एका दिवसातील उत्पादन ः ३० लाख फुले  सरासरी दर ः अडीच रुपये  एका दिवसाचे नुकसान ः ७५ लाख रुपये  आठ दिवसांचे नुकसान ः सुमारे ६ कोटी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT