The role of agricultural centers in disseminating technology is important
The role of agricultural centers in disseminating technology is important 
मुख्य बातम्या

`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी केंद्रांची भूमिका मोलाची`

टीम अॅग्रोवन

हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची भूमिका मोलाची आहे. कृषी विस्तार सेवा पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना त्यादृष्टीने निश्‍चितच फायदा होईल,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्रांद्वारे कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठीच्या कृषी विस्तार सेवा पदविका (डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स - डेसी) उत्तीर्ण कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. 

संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू बोंधारे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य माधुरी काटकर माने, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक महेंद्र माने, प्रा. नागेश माळोदे, प्रा. रमेश लोमटे, प्रा. साईनाथ मीनगिरे उपस्थित होते. 

पापळकर म्हणाले, ‘‘कृषी विस्तार सेवा पदविकेचा उद्देश निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे हा आहे. केव्हीकेच्या उपक्रमांचा  शेतकऱ्यांना फायदा होत आहे.’’

माने म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील हळदीला हिंगोली हळद म्हणून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मदत करावी.’’ डॉ. शेळके म्हणाले, ‘‘राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थान, हैदराबाद यांच्याद्वारे केव्हीकेद्वारे कृषी निविष्ठा विक्रेता पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचमधील ४० विद्यार्थ्यांपैकी १२ कृषी निविष्ठा विक्रेते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.’’

या वेळी पापळकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक विष्णू बाहेती, द्वितीय प्रकाश डांगरे, तृतीय गोपाल झाडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले. तर आभार राजेश भालेराव यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT