monsoon express
monsoon express 
मुख्य बातम्या

मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला 

टीम अॅग्रोवन

पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. सध्या अनेक भागांत पाऊस सुरू असल्याने या वर्षीही परतीचा प्रवास लांबला आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सूनचा परतीचा प्रवास एक सप्टेंबरला सुरू होतो. मात्र, राजस्थानमध्ये परतीच्या मॉन्सूनसाठी ३० सप्टेंबर दरम्यान पोषक वातावरण तयार होईल, असे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले. 

गेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले आहे. मॉन्सूनची पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख एक सप्टेंबर आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरच्या आत मॉन्सून देशाच्या सर्व भागांतून बाहेर पडतो. गेल्यावर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास ९ ऑक्टोबरला सुरू झाला होता. या वर्षीदेखील प्रवास लांबला आहे. 

जूनमध्ये जोरदार बरसल्यानंतर मॉन्सूनने जुलैमध्ये विश्रांती घेतली. पण ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दमदार हजेरी लावली. त्यानंतर सप्टेंबरमध्येही पावसाची बॅटींग सुरुच आहे. काही मोजके जिल्हे वगळल्यास कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. पश्चिम राजस्थानमधून सुरु होईल. त्यानंतर उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशमधून मॉन्सून परतलेला असेल. 

सध्या राजस्थानच्या पश्चिम भागात अजूनही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच दक्षिण उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून चक्रावातामध्ये रूंपातर होण्याची स्थिती आहे. याशिवाय मॉन्सूनचा आसही बिकानेर, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेश, गया ते मनिपूर, दक्षिण आसामपर्यंत आहे. अफगाणिस्तानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस पाऊस पडल्यानंतर पाऊस थांबण्याची शक्यता असून अनुकूल स्थिती तयार झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल. 

परतीच्या प्रवासावेळी वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरूवात होईल. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागातील पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झालेले दोन ते चार दिवसात पाऊस थांबेल. त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढलेले असतील. तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरूवात होईल. ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकणार असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होईल.  मागील १५ वर्षांत मॉन्सूनच्या परतीचा प्रवास  २००५:  २ सप्टेंबर २००६ः २१ सप्टेबर   २००७ः ३० सप्टेंबर २००८ः  २९ सप्टेंबर२००७  २००९ः २६ सप्टेंबर २०१०ः २७ सप्टेंबर   २०११ः २३ सप्टेंबर २०१२ः २४ सप्टेंबर   २०१३ः ९ सप्टेंबर   २०१४ः २३ सप्टेंबर   २०१५ः ४ सप्टेंबर   २०१६ः १५ सप्टेंबर   २०१७ः २७ सप्टेंबर   २०१८ः २९ सप्टेबर   २०१९ः ९ ऑक्टोबर   प्रतिक्रिया महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागातही परतीचा चांगला पाऊस पडतो. कोकणात परतीचा पाऊस कमी असतो. परंतु दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात ईशान्येकडील पाऊस नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत सुरू असतो. चालू वर्षी उशीराने ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात परतीचा प्रवास सुरू  होणार असून तो काही प्रमाणात लांबण्याची शक्यता आहे.  - डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख, पुणे वेधशाळा विभाग, पुणे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT