मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरूच The return journey of the monsoon continue
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरूच The return journey of the monsoon continue 
मुख्य बातम्या

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरूच

टीम अॅग्रोवन

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. राजस्थानातून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण उत्तर भारतातून माघार घेतली आहे. शनिवारी (ता. ९) संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांत शुक्रवारी (ता. ८) वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला असून, परतीची सीमा मोतीहारी, गया, आंबिकापूर, मांडला, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदरपर्यंत होती.  मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू असून, देशाच्या आणखी काही भागांतून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. मंगळवारपर्यंत (ता. १२) गुजरात, छत्तासगडचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश झारखंड, बिहारचा बहुतांशी भाग, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विजा, मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत परतीचा पाऊस पडत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत (ता. ११) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. १५) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा. विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी. मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT