मजुराला होणाऱ्या विषबाधेची जबाबदारी आता शेतमालकावर
मजुराला होणाऱ्या विषबाधेची जबाबदारी आता शेतमालकावर 
मुख्य बातम्या

मजुराला होणाऱ्या विषबाधेची जबाबदारी आता शेतमालकावर

टीम अॅग्रोवन

नागपूर ः सुरक्षा साधनांचा वापर न करता मजुराने फवारणी केल्यास आणि त्यामुळे त्यांना विषबाधा झाल्यास याची जबाबदारी थेट शेतमालकावर निश्‍चित करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. अशा प्रकरणात यापुढे आता थेट शेतमालकावर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  महाराष्ट्रात गेल्या वर्षी फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा आणि मृत्यूंमुळे देशभरात खळबळ उडाली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पथकानेदेखील या घटनांची दखल घेत यवतमाळसह राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालात विषबाधेमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शेतमालकाने फवारणी करणाऱ्या मजुराकडे तो या कामासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करावी, या शिफारसीचादेखील समावेश आहे. फवारणी करणाऱ्या मजुराने सेफ्टी किटमधील साहित्याचादेखील वापर करण्याच्या सूचना आहेत. अशा प्रकारच्या सुरक्षाविषयक बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आणि त्यातून मजुराला विषबाधा होत तो दगावल्यास त्याची जबाबदारी शेतमालकावर निश्‍चित करण्यात आली आहे. कृषी विभागाने या संदर्भात निर्णय घेतल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.  विषबाधेमुळे या वर्षी एक मृत्यू,  आठ दाखल वाशीम जिल्ह्यातील एका मजुराचा या वर्षी फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यात आठ जण फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याच्या कारणामुळे दाखल झाले आहेत. त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णायालत उपचार सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT