Response to MGNREGA due to good rains
Response to MGNREGA due to good rains 
मुख्य बातम्या

चांगल्या पावसामुळे ‘मनरेगा’ला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

जळगाव : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे काम मिळवून देणारी योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठरली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला खरा, मात्र आजही या योजनेत सहा हजार ९२० बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पाऊस चांगला होत असल्याने वृक्षलागवड, फळबाग लागवड अशा कामांवर अधिक मजूर काम करताना दिसत आहेत. 

लॉकडाउनच्या काळात या योजनेंतर्गत सुमारे नऊ हजार १३७ मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला होता. आता मजूरसंख्येत दोन हजारांनी घट झाली आहे. २०२०-२१ या वर्षात या योजनेंतर्गत ४६९ कोटी ६१ लाख एवढा निधी मजुरीवर खर्च झाला आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे करण्यात आली आहेत. त्यात फळबाग लागवड, वृक्षलागवड, शोषखड्डे, घरकुल सिंचन विहीर, रस्ते, नाला खोलीकरण, संरक्षक भिंत अशी कामे करण्यात आली आहेत. 

पावसाळ्यात सध्या मजूरसंख्या कमी आहे. तरीही सहा हजार ९२० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यंदा मजुरी २३८ वरून २४८ एवढी झाली. त्यामुळे मजुरांमध्ये आनंद आहे. वृक्षलागवड, वैयक्तिक शौचालय, फळबाग लागवड, विहीर खोलीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळांना कंपाउंड अशी कामे सुरू आहेत.  - प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जळगाव.

‘रोहयो’चे आकडे  

सध्या सुरू कामे १,२०९
ग्रामपंचायतीची संख्या ५०६
मजुरांची संख्या   ६ हजार ९२०
आजअखेर मनुष्यनिर्मिती दिवस १,६३,५५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT