सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ठराव
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ठराव  
मुख्य बातम्या

सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ठराव

टीम अॅग्रोवन

सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यातील दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अनुदान देण्याचा ठराव सोमवारी (ता. १७) कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सदस्या रेखा राऊत यांनी हा ठराव मांडला. तो मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहात झालेल्या या बैठकीत रेखा राऊत, गणेश पाटील, अनिरुद्ध कांबळे, शुभांगी उबाळे, संगीता मोटे,  दादासाहेब बाबर, अनिल मोटे उपस्थित होते. गुजरातमध्ये खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पैसे दिले जातात. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचा ठराव राऊत यांनी मांडला. त्यावर आता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. 

पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेकडे वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दोन हजार १७५ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले. त्यातील एक हजार ४२ शेतकऱ्यांनी शेती उपयोगी वस्तू खरेदी न केल्याने त्यांचे प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाकडून चॉपकटर, पाच एचपी विद्युत मोटार, डिझेल इंजिन, पल्टी नांगर, पेरणी यंत्र अशा विविध वस्तूंचा चार हजार ११५ शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

नव्याने आलेल्या दोन हजार ५०० प्रस्तावांना मंजुरी दिली. या शेतकऱ्यांनी जानेवारी महिनाअखेरपर्यंत साहित्याची खरेदी करायची आहे. त्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील, असे सभापती पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT