Research is needed to increase the value of banana crop: Vice Chancellor Dr. Vishwanatha
Research is needed to increase the value of banana crop: Vice Chancellor Dr. Vishwanatha 
मुख्य बातम्या

केळी पीक मूल्यवृद्धीसाठी संशोधन गरजेचे ः कुलगुरू डॉ. विश्वनाथा

टीम अॅग्रोवन

नगर ः महाराष्ट्रामध्ये ८० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. त्यापैकी ४१ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यात असून तेथील केळीची उत्पादकता देशामध्ये सर्वात जास्त म्हणजे ५५ टनापर्यंत आहे. केळी पिकातील निर्यातीचे प्रमाण अर्धा टक्क्यापर्यंत असून ते एक टक्क्यापर्यंत जरी वाढले तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. केळी पिकामध्ये मूल्यवर्धनाबरोबरच खोडाचा उपयोग टेक्सटाईल तसेच करन्सी नोटांच्या छपाईमध्ये लागणाऱ्या कागदासाठी करणे यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, केळी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कृषी सहायक व कृषी अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय ‘केळी पिकावरील कीड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण झाले.

यावेळी डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले की, शेतकऱ्यांना केळीची दर्जेदार रोपे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. केळी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव हा लागवड क्षेत्रातून होतो. यामध्ये व्यवस्थापन जर काळजीपूर्वक केले तर यावर नियंत्रण आणता येईल. यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. केळी पिकाची लागवड करतांना दोन झाडांतील अंतर वाढविणे या बरोबरच यांत्रिकीकरणाचा सुयोग्य वापर यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

यावेळी प्रशिक्षणात रावेर (जळगाव) विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, निम्नस्तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, कृषी किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, उपसंचालक अनिल भोकरे व कृषिभूषण रवींद्र कडलग सहभागी झाले होते. डॉ. के. बी. पवार, महेश महाजन, डॉ. हेमंत बाहेती, अनिल भोकरे, प्रा, किरण जाधव, डॉ. विशाल वैरागर आदी यावेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT