Release rotation for cotton cultivation: Co. Kshirsagar
Release rotation for cotton cultivation: Co. Kshirsagar 
मुख्य बातम्या

कपाशी लागवडीसाठी जायकवाडीचे आवर्तन सोडा : कॉ. क्षीरसागर

टीम अॅग्रोवन

परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्याव्दारे खरीप कपाशी लागवडीसाठी सोमवार (ता.१) पासून पाणी आवर्तने सोडावी, खरिप हंगामात संरक्षित सिंचन पाणीपाळी देण्यासाठी तत्काळ नियोजन करावे, आदी मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. 

लॉकडाऊनमुळे उद्योगांचा पाणी वापर ठप्प झाल्याने जायकवाडी प्रकल्पातील पाण्यात बचत झाली. सध्या उपलब्ध ४० टक्के पाण्यातून खरिप कपाशी अन्य खरीप पिकांच्या लागवडीसाठी सोमवार (ता.१)जून पासून डाव्या व उजव्या कालव्यातून २ लाख ३७ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रासाठी पाणी आवर्तने सोडावी. माजलगाव प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडावे. गोदावरी नदीवरील सर्व ११ बंधाऱ्यांमध्ये कालव्याव्दारे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा द्यावा, पूरनियंत्रणासाठी सर्व धरण क्षेत्रात उपाययोजना गतिमान कराव्या. विदर्भ व मराठवाड्यातील धरणात पाणी असलेल्या जिल्ह्यांमध्ये याप्रकारचे नियोजन अमंलात आणावे. 

कालव्यांची दुर्दशा झाल्याने आणि गैरव्यवस्थापन झाल्याने न वापरलेले पाणी आणि अन्यत्र वळवण्याचे प्रकार बंद करावे. कालवे दुरुस्तीसाठी निधी द्यावा. जलसुधार प्रकाल्पाखालील पूर्णा प्रकल्पासाठी ७६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी. कालव्यांची स्थापित कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी दुरस्ती करावी. पुणे येथील औद्योगिक पाणी वापर न झाल्यामुळे शिल्लक पाणी उजनी प्रकल्पाखालील लाभधारक शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी द्यावे,

मुख्य अभियंता, मुख्य प्रशासक जायकवाडी प्रकल्प, लोअरदुधना प्रकल्प व अनुषंगिक सिंचन व्यवस्थापनाची निगडित कार्यालय तातडीने परभणी जिल्ह्यात स्थलांतरित करावी. महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनातील अनागोंदी, गैरव्यवस्थापन दूर करण्यासाठी शेतकरी केंद्रित सिंचन व्यवस्थेसाठी उपाययोजना कराव्या. वडनेरे समितीच्या गैर लोकतांत्रिक, अशास्त्रीय कार्यप्रणाली बदल करावेत. प्रदीप पुरंदरे यांच्या अभ्यास व शिफारशीचा समावेश करावा, आदी मागण्या क्षीरसागर यांनी केल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT