Registration for purchase of sorghum and maize starts in Akola
Registration for purchase of sorghum and maize starts in Akola 
मुख्य बातम्या

अकोल्यात ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन

अकोला ः भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मक्याची आधारभूत किमतीने खरेदी केली जाणार असून यासाठी जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुका वगळता इतर सहा तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. यापैकी तीन ठिकाणी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदी सरू झालेली नसून या प्रक्रियेस विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

भरडधान्य योजनेअंतर्गत ज्वारी, मक्याची खरेदी सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून गेल्या काळात देण्यात आलेले आहेत. यानुसार जिल्ह्यात अकोला, पातूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, अकोट या तालुकास्तरावर शासकीय गोदामाच्या ठिकाणी ही खरेदी केली जाणार आहे. अकोट, तेल्हारा, अकोला या केंद्रावर नोंदणीसुद्धा सुरू झाली आहे.

पातूर, बाळापूर आणि मूर्तिजापूर येथे अद्याप नोंदणी सुरू व्हायची आहे. पिकांच्या सरासरी उत्पादकतेनुसार ही खरेदी होती. मका हेक्टरी ३५ क्विंटल आणि ज्वारी हेक्टरी ५० क्विंटल या प्रमाणात खरेदी केली जाईल. बार्शीटाकळी येथील केंद्र आधीच काळ्या यादीत असल्याने त्याठिकाणी खरेदी केली जाणार नाही.

गोदाम, बारदान्याची अडचण ही धान्य खरेदी सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच गोदाम व बारदान्याची अडचण निर्माण झालेली आहे. शासकीय गोदमांमध्ये आधीच धान्य साठवलेले आहे. त्यामुळे हे नवीन धान्य खरेदी करताना ठेवण्यासाठी जागा लागणार आहे. यासोबतच बारदाना कधी उपलब्ध होतो त्यावरही खरेदी अवलंबून आहे. आगामी आठवड्यात या खरेदीचा गुंता सुटण्याची चिन्हे आहेत. भरडधान्य खरेदीला आधीच उशीर झालेला आहे. त्यातच पावसाचे दिवस सरू होत असल्याने खरेदीच्या मार्गात अडथळे वाढण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT