Register online for sale of cotton with Parbhani Market Committee, deadline is Monday
Register online for sale of cotton with Parbhani Market Committee, deadline is Monday 
मुख्य बातम्या

परभणी बाजार समितीकडे ऑनलाइन कापूस नोंदणी करा, सोमवारपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यापूर्वी कापूस विक्रीसाठी ऑफलाइन पध्दतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जाव्दारे नोंदणी करणे बंधनकारक आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी’’, असे आवाहन बाजार समितीचे सभापती समशेर वरपुडकर यांनी केले. 

बाजार समितींतर्गंत पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी यापूर्वी ऑफलाइन अर्ज घेण्यात आले. समितीच्या कार्यक्षेत्रातील १२५ गावांतील शेतकऱ्यांनी साडेतीन हजारावर अर्ज केले. परंतु या शेतकऱ्यांना आता त्यांच्या कापूस विक्रीसाठी https : //forms.gle VUASetva7aDqkGn3A या गुगल लिंकव्दारे ऑनलाइन अर्जाद्वारे नोंदणी करावी लागेल. सोमवार (ता.२७) सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणीसाठी अंतिम मुदत आहे. 

नोट कॅमेऱ्याव्दारे कापसासोबत काढलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणीचा डाटा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून बाजार समितीस प्राप्त झाल्यानंतर खरेदीबाबत शेतकऱ्याना दूरध्वनीद्वारे, एसएमएसव्दारे कळविण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणावा. त्यावेळी सातबारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबुक सोबत आणावे. मास्क वापरणे बंधनकारक आहे.

यार्डावर येणारी सर्व वाहने क्रमवार लावून दोन वाहनातील अंतर किमान १० ते १५ फुट राहील याची दक्षता घ्यावी. शासकीय खरेदी केंद्र आणि बाजार समितीमधील सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिले. 

मार्केट यार्डातील सर्वांनी कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सभापती वरपुडकर यांच्यासह संचालक मंडळातर्फे करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT