Recognition of 9 varieties of crops and 4 varieties of fruits
Recognition of 9 varieties of crops and 4 varieties of fruits 
मुख्य बातम्या

  पिकांचे ९, फळांच्या ४ वाणांस मान्यता

टीम अॅग्रोवन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे शुक्रवारी (ता.२४) ते गुरुवारी (ता. ३०) या कालावधीत आयोजित चार कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन व विकास समितीच्या (जॉइंट अॅग्रेस्को) ४९ व्या बैठकीमध्ये कृषी विद्यापीठांच्या सोयाबीन, करडई, उडीद, रब्बी ज्वारी, ज्वारी हुरडा, भात, तीळ, ऊस या पिकांच्या नऊ नवीन वाणांची आणि फळपिकांच्या दोन लागवडीसाठी शिफारस करण्यात आली. राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या फळपीकांच्या दोन वाणांना देखील मंजुरी देण्यात आली आहे. चार कृषी विद्यापीठांची १५ यंत्रे, अवजारांना मान्यता दिली. बैठकीत एकूण पिकांच्या १६ वाणांचे सादरीकरण झाले. त्यापैकी नऊ नवीन वाण प्रसारित करण्याची शिफारस केली. इतर सहा वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाल्याची नोंद घेतली. पिकांचे नवीन वाण   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी   रब्बी ज्वारी हुरडा ः  परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-१०१) रब्बी ज्वारीचा हुरडा वाण इतर वाणांपेक्षा हिरवा, उत्पादनात सरस, दाणे मऊ गोड असून, कणसातून सहज वेगळे होतात. खोडमाशी, खोडकिडा प्रतिकारक आहे. मराठवाडा विभागात लागवडीसाठी शिफारस.

सोयाबीन ः एमएयूएस-७२५ हा वाण स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील तुल्यबळ वाणांपेक्षा उत्पादनात सरस, विविध कीड रोगास मध्यम प्रतिकारक आढळून आला. मराठवाडा विभागात लागवडीसाठी शिफारस.

 करडई ः परभणी सुवर्णा (पीबीएनएस-१५४) हा वाण पीबीएनएस १२ व शारदा वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारा. मर रोग, पानावरील ठिपके, मावा किडीस सहनशील आढळून आला. मराठवाडा विभागासाठी शिफारस.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 

 भात ः पीडीकेव्ही साधना  (एसकेएल ३-१-४१-८-३३-१५) कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारा आणि लांब दाण्याचा भात. विदर्भात खरीप हंगामात रोवणी पद्धतीने लावडीसाठी शिफारस.   रब्बी ज्वारी हुरडा ः ट्रॉम्बे अकोला सुरूची  (टी ए केपीएस-५) ट्रॉम्बे अकोला सुरूची हा अधिक उत्पादन देणारा, गोड चवीचा, उत्कृष्ट स्वाद, मळणीस सुलभ वाण, विदर्भातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस.  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

  रब्बी ज्वारी  ः फुले यशोमती  ज्वारीचा हा वाण पश्‍चिम महाराष्ट्रासाठी हलक्या जमिनी आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्याची शिफारस. 

 उडीद ः फुले वसू (पीयु ०६०९-४३) अधिक उत्पादन देणाऱ्या  या वाणाची पश्‍चिम महाराष्ट्रातील उडीद पिकविणाऱ्या भागात लागडीसाठी शिफारस.

 तीळ ः फुले पुर्णा (जेएलटी-४०८-२) उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन, प्रचलित वाणांपेक्षा सरस, राज्यातील खानदेश, मराठवाडा विभागात लागवडीसाठी शिफारस. 

 ऊस ः फुले -११०८२ (कोएम -११०८२) उसाचा लवकर परिपक्व होणारा वाण, महाराष्ट्रात सुरू आणि पूर्वहंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस. फळपिके ः  स्वीकृती देण्यात आलेले वाण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  पेरू ः फुले अमृत चमकदार हिरवट, पिवळसर फळे, लाल रंगाचा, मध्यम बियांची संख्या, मध्यम मऊ बी, अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी शिफारस.   चिंच ः फुले श्रावणी फळांचा आकर्षक तपिकिरी रंग, किंचित वक्र, चवीला मध्यम गोड, गराचे प्रमाण अधिक असलेला  वाण महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस.  राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, पुणे   द्राक्ष ः मांजरी किशमिश बेदाण्याचा एक सारखा आकार, रंग, अधिक उतारा, चांगली प्रत, आणि अधिक उत्पादन देणारा वैशिष्ट्यपूर्ण वाण महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीसाठी शिफारस.  राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, केगाव, सोलापूर  डाळिंब  ः सोलापूर लाल कमी दिवसांमध्ये तयार होणार, अधिक उत्पादन देणारे वाण. महाराष्ट्रात शिफारस. मान्यता दिलेली कृषी यंत्र, अवजारे वनामकृवि, परभणी       ट्रॅक्टरचलित आंतरमशागत व फवारणी यंत्र      बैलचलित गादी वाफा तयार करणे यंत्र      एक बैलचलित सरी यंत्र      स्वयंचलित फ्लैल मूव्हर      मनुष्यचलित रोपे लागवड यंत्र      मधुमका कणसाचे दाणे काढणारे हस्तचलित यंत्र      बैलचलित बहुउद्देशीय फिरती सौरऊर्जा गाडी

पंदेकृवि, अकोला       ट्रॅक्टरचलित गवत कापणी यंत्र      बैलचलित चिखलणी यंत्र      चारोळी बीज प्रतवारी व फोडणी यंत्र      लाल मिरची बीज काढणी यंत्र      ज्वारी हुरडा काढणी यंत्र बासाकोकृवि, दापोली       कोकण कल्प खेकडा पकड यंत्र      हस्त व पदचलित इंधन वडी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  ट्रॅक्टरचलित फुले ऑटोमॅटिक पल्टी नांगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT