गहू
गहू 
मुख्य बातम्या

नागपूर बाजारात गहू आणि तांदूळ स्थिर

Vinod Ingole

नागपूर ः बाजारात सरबती गहू गेल्या आठवडाभरापासून स्थिर असल्याचे चित्र आहे. बाजारात २१०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने गव्हाचे व्यवहार होत आहेत. लुचई तांदूळदेखील १९०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिर असून, तांदळाची ८०० क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली आहे. बाजार समितीत हरभऱ्याचीदेखील आवक होत आहे. १९० ते २९० क्‍विंटलची आवक सरासरी असून, हरभरा दरात काहीशी घसरण झाली आहे. ४००० ते ४६०० रुपये प्रतिक्‍विंटल असलेला हरभरा ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर आला आहे. २४ ते ४६० क्‍विंटल अशी आवक असलेल्या तुरीचे दर ३५५० ते ३९२६ रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. बाजारात सोयाबीनची आवक दररोज वाढती आहे. ५१०० क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक सोयाबीनची होत आहे. २२४० ते  २७२६ रुपये प्रतिक्‍विंटल असे सोयाबीनचे दर आहेत. मोठ्या आकाराच्या संत्रा फळाची आवक १२०० ते १५०० क्‍विंटलची आहे. २४०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल असे संत्रा दर आहेत.  मोसंबीचीदेखील बाजारात आवक होत असून, मोसंबीची दररोजची सरासरी आवक २५०० क्‍विंटलची आहे. २५०० ते ३३०० रुपये प्रतिक्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत आहेत. डाळिंबाचीदेखील बाजारात आवक आहे. १००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल असे डाळिंबाचे दर असून, आवक ११०० ते २४०० क्‍विंटल अशी आहे. बटाटा आवक आठवड्यात ३००० ते ७००० क्‍विंटलची झाली. ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल असा बटाट्याचा दर होता. सोमवारी (ता. ३०) पांढऱ्या कांद्याची १००० क्‍विंटल आवक झाली. ६०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने कांदा व्यवहार झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

SCROLL FOR NEXT