fodder
fodder  
मुख्य बातम्या

पशुखाद्य दर गगणाला भिडले

Abhijeet Dake

सांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य उद्योगाला बसला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने वर्षभरात पशुखाद्याच्या दरात तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या मागणीतही ५० टक्क्यांनी घट झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या जोडीला दुग्धव्यवसाय सुरू केला. शेतकऱ्यांचा हाच मुख्य व्यवसाय बनला. जातिवंत दुधाळ जनावरे खरेदी करून, या व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून दिले. निवारा शेड, त्याचबरोबर मुक्त गोठा पद्धती, मिल्क मशीन, कडबा कुट्टी मशीन अशा अनेक सुविधांसाठी मोठी गुंतवणूक शेतकऱ्यांनी या व्यवसायात केली आहे. दुग्धव्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता आली. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यात पडलेला दुष्काळ आणि यंदा झालेला पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातून पिकांचे उत्पादनही मिळाले नाही. याचा फटका पशुखाद्यनिर्मितीस लागणाऱ्या कच्चा मालावर झाला. परिमाणी, कच्चा मालांच्या दरात वाढ झाली. कच्च्या मालाच्या दरात सातत्याने चढ- उतार होत आहेत. यामुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी आणि पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

दुष्काळ पुराचा परिणाम  दुष्काळामुळे पिके पाण्याविना वाळून गेली. त्यातच महापुरामुळे पिके पाण्याने कुजून गेली. परिणामी, जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला नाही. त्यातच पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने जनावरे सांभाळण्याचा खर्चात वाढल्याने पशुपालकांनी जनावरे विक्री करू लागली आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या मागणीतही पन्नास टक्के घट झाली आहे. दर कमी होण्याची शक्यता सध्या बाजारात शेतीमालाची आवक येऊ लागली आहे. परंतु, ही आवक खाद्यनिर्मितीसाठी पुरेशी नाही. येत्या पहिल्या दोन महिन्यांत पुरेशा कच्च्या मालाची आवक होईल. त्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दर असेच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया महापुरानंतर जनावरे सांभाळणे मुश्कील झाले. त्यातच पशुखाद्याचे दर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोणत्याही संघाने दूध दर वाढ केली नाही. त्यामुळे दावणीला १७ जनावरे होती. खर्च वाढला असल्याने ६ जनावरांची विक्री केली. - प्रीतम पाटील, दुधगाव, ता. मिरज.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT