कापूस
कापूस  
मुख्य बातम्या

सरकी तेलास उठाव; दरात वाढ

Chandrakant Jadhav

जळगाव : सोयाबीनचा बाजारातील पुरवठा रखडत सुरू असल्याने सरकी तेलाचा उठाव वाढला आहे. दर ६४ रुपये प्रतिकिलोवरून ७१ ते ७२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. सरकीच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची वाढ दिसत आहे. परिणामी, कापूस दरातही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा झाली आहे.  यातच चीन-अमेरिकेत व्यापारयुद्धासंबंधी पुन्हा एकदा ३१ जानेवारी रोजी चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी ट्‌वीट करून व्यापारासंबंधी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. पुढे दोन्ही देशांचे प्रमुख निर्णय घेतील, असे म्हटले आहे. स्पष्ट निर्णय मात्र जाहीर केलेला नाही. अशा सगळ्या स्थितीत रुई व सुताच्या बाजारात मात्र कोणतीही सकारात्मक हालचाल झालेली नाही, परंतु सोयाबीनचा काहीसा तुटवडा ऑइल मिलसमोर असल्याने सरकीला उठाव आहे. कापसाच्या उत्पादनातही मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे २५ ते ३० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) घट येणार आहे. रुईच्या एका गाठीतून कमाल सव्वा तीन क्विंटलपर्यंत सरकी उपलब्ध होते. अर्थातच, या हंगामात सुमारे ११ कोटी क्विंटलपर्यंत सरकी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. वायदा बाजारात सरकीचा साठा हवा तसा नाही. कारण बाजारात कापसाची आवक कमी आहे. जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये सरकीचे उत्पादनही जेमतेम स्थितीत असतानाच सरकी तेलाचे दर किलोमागे सुमारे सहा ते सात रुपयांनी वधारले आहेत. एक क्विंटल सरकीद्वारे १० ते १२ किलो तेल उपलब्ध होते. खाद्यतेल म्हणून या तेलाचा उपयोग देशात अनेक भागात केला जातो. दुसऱ्या बाजूला सरकी ढेपचे दर १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. परिणामी कापूस दरातही सुधारणा झाल्याची माहिती मिळाली.  चीनमध्ये नव्या वर्षाचा आनंद कापसाचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या चीनमध्ये फेब्रुवारीपासून नवे वर्ष सुरू होते. तेथे नव्या वर्षाचे स्वागत सुरू असून उद्योग, व्यापार पुढील १० ते १५ दिवस बंदावस्थेत राहील. चीन-अमेरिकेत व्यापारयुद्धासंबंधी पुन्हा एकदा वॉशिंग्टनमध्ये अधिकारीस्तरीय चर्चा ३१ जानेवारी रोजी झाली. यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून निर्णय आपण जाहीर करू, असे म्हटले. या चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार स्थिर झालेला असला तरी कुठल्याही सकारात्मक हालचाली सूत, रुईच्या निर्यातीसंबंधी झालेल्या नाहीत. निर्यातीला चालना मिळाली तर पुढे अनेक सकारात्मक घडामोडी कापूस बाजार, वस्त्रोद्योगात घडू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.  प्रतिक्रिया सरकी तेलाच्या दरात किलोमागे सहा ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. सरकीचे दर मागील चार पाच दिवसांत वाढले होते, परंतु दर पुन्हा काहीसे कमीदेखील झाले आहेत. कापूस बाजारात किरकोळ वाढ झालेली असून, आवक कमी आहे.  - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT