Rapid increase in water storage of projects in Marathwada
Rapid increase in water storage of projects in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये अलीकडे झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पाणीसाठा वाढतो आहे. शिवाय कोरड्या प्रकल्पांचीही संख्या घटत असून, सर्व प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ४३ टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. 

गत आठवड्याच्या तुलनेत प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा २३ जुलै अखेरपर्यंत जवळपास ६ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ४९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. पावसाचे तेवढे प्रमाण नसल्याने जायकवाडीत अजून आवक सुरू नाही. जायकवाडीत सद्यःस्थितीत ३६ टक्‍के उपयुक्‍त साठा आहे. 

हिंगोलीतील सिद्धेश्‍वर प्रकल्पांत ६९ टक्‍के, नांदेड यवतमाळच्या सीमेवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांत ६३ टक्‍के, येलदरीत ७० टक्‍के, निम्न मनारमध्ये ८२ टक्‍के, विष्णुपुरीत ७५ टक्‍के, निम्न दुधनामध्ये ८३ टक्‍के निम्न तेरणामध्ये ५७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पांत अजून अनुक्रमे ३० व २२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. तर सीनाकोळेगाव प्रकल्पात अजून उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत ६८ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ६१ टक्‍के, जालन्यातील ७ व बीडमधील १६ प्रकल्पांत प्रत्येकी ४० टक्‍के, औरंगाबादमधील १६ प्रकल्पांत २३ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत २१ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत १८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ७५३ लघू प्रकल्पांची अवस्था अजूनही चांगली सुधारली असे म्हणता येणार नाही. ७५३ लघू प्रकल्पांमध्ये २५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ लघू प्रकल्पांत केवळ ८ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. जालन्यातील ५७ प्रकल्पांत २७ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २२ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २५ टक्‍के, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पांत १७ टक्‍के, हिंगोलीतील २६ प्रकल्पांत ३१ टक्‍के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ५८ टक्‍के तर परभणीतील २२ मध्यम प्रकल्पांतील ५२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

३१ लघू प्रकल्प अजूनही कोरडे मराठवाड्यातील ७५३ लघू प्रकल्पांपैकी अजूनही ३१ प्रकल्प कोरडेच आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ७, बीडमधील ८, लातूरमधील ९ व उस्मानाबादमधील ७ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे २२२ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील ४८, जालन्यातील २४, बीडमधील ४९, लातूरमधील २६, उस्मानाबादमधील ६५, नांदेडमधील ७, हिंगोलीतील २ व परभणीतील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT