पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीची पाहणी करताना राजू शेट्टी
पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीची पाहणी करताना राजू शेट्टी 
मुख्य बातम्या

राजू शेट्टींनी केली सिल्लोडमध्ये पीक नुकसान पाहणी

टीम अॅग्रोवन

सिल्लोड, जि. औरंगाबाद  : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. ५) केली.

तालुक्यातील भवन, मंगरूळ, हट्टी, मांडणा, गोळेगाव, सारोळा या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात श्री. शेट्टी यांनी पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी श्री. शेट्टी म्हणाले, की राज्यात काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी शासनाने महापुराची स्थिती पाहता शेतकऱ्यांना भरीव निधीची तरतूद करून नुकसानभरपाई दिली. आता हाच निकष ठेवून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.

मराठवाड्यात पावसामुळे तसेच सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर पीकविमा कंपन्यांनीसुद्धा पीकविम्याची रक्कम देताना शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, जिल्हा उपाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, तालुकाध्यक्ष सुनील सनानसे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT