रिकव्हरीचा बेस साडेनऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा : शेट्टी
रिकव्हरीचा बेस साडेनऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा : शेट्टी 
मुख्य बातम्या

रिकव्हरीचा बेस साडेनऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा : शेट्टी

टीम अॅग्रोवन

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर :  यंदाच्या हंगामात रिकव्हरीचा बेस दहा ऐवजी साडे नऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा आणि एक रकमी एफआरपी द्या. मागणी मान्य होईपर्यंत हंगाम सुरू करू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत दिला. जयसिंगपूर येथे शनिवारी (ता.२७)  झालेल्या स्वाभिमानीच्या सतराव्या ऊस परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या साखरविषयक धोरणावर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, की सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा एफआरपीमध्ये २०० रुपयांनी वाढ केली आहे. पण, वस्तूस्थिती वेगळी आहे. एफआरपीचा रिकव्हरी बेस हा ९.३० टक्‍क्‍यावरून केंद्र सरकारने १० टक्के केला आहे. त्यामुळे उलट शेतकऱ्यांना टनामागे जादा रक्कम भरावी लागणार आहे. त्यातच डिझेलचे दर वाढले आहेत. खताच्या किंमतीसुद्धा १०० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. एकंदरीत उसाच्या उत्पादन खर्चात टनामागे ४० ते ४५ रुपयांनी वाढ झाली आहे. २०० रुपये एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी, त्यातील टनामागे १८६ रुपये शेतकऱ्यांकडून काढून घेणार आहे. म्हणजे ही निव्वळ फसवणूक आहे.

 ज्या साखर कारखान्यांनी अद्याप २०१७-१८ सालची एफआरपी दिलेली नाही, त्या साखर कारखान्याच्या संचालकांवर कोर्टाच्या आदेशानुसार त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे. राज्य बँकेकडून कर्ज स्वरूपातील उचल ९० टक्के करण्यात यावी, अशी मागणी श्री शेट्टी यांनी यावेळी केली.

यावेळी रविकांत तुपकर, सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंदर पाटील, आदींची भाषणे झाली. यावेळी संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

परिषदेतील संमत झालेले ठराव

  • उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव विधेयक व संपूर्ण कर्जमाफी मिळावी
  • गेल्या वर्षीची एफआरपी ज्यांनी दिली नाही त्या साखर कारखान्याच्या संचालकावर गुन्हे दाखल करावेत
  • सरकार दूधाला देत असलेले प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान कायम ठेवावे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT