सरकारच्या कर्जमाफीचे लाभार्थीच सापडत नाहीत : राजू शेट्टी
सरकारच्या कर्जमाफीचे लाभार्थीच सापडत नाहीत : राजू शेट्टी 
मुख्य बातम्या

सरकारच्या कर्जमाफीचे लाभार्थीच सापडत नाहीत : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली.  मंत्रालयात आलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली. आघाडी सरकारच्या काळात जसा कर्जमाफीच्या योजनेत घोळ झाला. त्या पद्धतीने भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत घोळ झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एकाबाजूला राज्य सरकार अमुक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचे सांगते. मात्र प्रत्यक्षात कोणाला लाभ झाला याची माहिती घ्यायला गेले तर लाभार्थीच सापडत नाही. हे मी राजकीय हेतूने नाही, तर वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यातही खरेच पैसे जमा झालेत का, याचीही माहिती तपासून पाहायला हवी, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी दोंडाईचा येथील सोलर प्रकल्पासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केलेली जमीन खरेदी चुकीची असल्याचे सांगत एकदा नोटिफायड झालेल्या जमिनीची खरेदी–विक्री तर सोडाच खातेफोडही करता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच रावल यांना यात किती लाभ मिळाला याची चौकशीही होण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, खासदार शेट्टी यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.  आमदार अनिल गोटे यांचा घरचा आहेर... शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतरही भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. दोंडाईचा प्रकल्पासाठी भूमाफियांनी कशारीतीने भूसंपादन केले आणि त्यांना कसा राजकीय आश्रय मिळाला याअनुषंगाने त्यांनी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठविले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनावरून पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT