बेदाणा दरात ३० रुपयांची घसरण
बेदाणा दरात ३० रुपयांची घसरण 
मुख्य बातम्या

बेदाणा दरात ३० रुपयांची घसरण

Abhijeet Dake

सांगली ः यंदा बेदाणानिर्मितीसाठी पोषक वातावरणामुळे बेदाणा उत्पादकांना दिलासा मिळाला. गेल्या वर्षी बेदाण्याचे १ लाख ६० हजार टन उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात १ लाख ९० हजार टन उत्पादन होईल, म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा ३० हजार टनाने वाढण्याची शक्यता उत्पादकांनी व्यक्त केली. बेदाण्याचे उत्पादन वाढले; मात्र निर्यात रोडावली. त्यामुळे दर प्रतिकिलोस ३० रुपयांनी दर कमी झाले.  जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात बेदाण्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत बेदाण्याला अपेक्षित दर मिळाला नसल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला होता. गेल्यावर्षी देखील नैसर्गिक आपत्ती आली होती. सन २०१७-१८ मध्ये बेदाण्याचे १ लाख ६० हजार टन उत्पादन झाले होते. सन २०१६-१७ च्या तुलनेत २० हजार टनाने बेदाण्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली होती. हे दर टिकून राहिल्याने याचा फायदा बेदाणा उत्पादकांना झाला. त्यातच गेल्यावर्षी उत्पादन कमी झाल्याने संपूर्ण बेदाण्याची विक्री झाली. त्यामुळे गेल्यावर्षीचा बेदाणा शिल्लक नाही.  यंदा नैसर्गिक आपत्ती टळली. त्यामुळे बेदण्याचे नुकसान झाले नाही. त्यातच द्राक्षाला दर कमी असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री न करता थेट बेदाणा उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यामुळे राज्यात बेदाण्याचे उत्पादन ३० हजार टनाने वाढण्याची शक्यता आहे. अर्थात यंदा १ लाख ९० हजार टन बेदाणानिर्मिती होईल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बेदाण्याची सध्याची आवक पुढील वर्षापर्यंत पुरेशी आहे. त्यापद्धतीने जूनपासून दर सुधारण्याची चिन्‍हे आहेत.

  • उत्पादनाच्या तीस टक्के आखाती देशात बेदाण्याची निर्यात
  • बेदाण्याची निर्यात कमी असल्याने दर खालावले
  • गेल्या वर्षीपेक्षा सरासरी प्रतिकिलोस ३० रुपयांनी दर कमी
  • दर कमी असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता 
  • प्रतिक्रिया बेदाणा व्यापाऱ्यांना सेवा करांच्या दिलेल्या नोटिसांमुळे व्यापारी खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादकांना कठीण काळ आहे. बेदाण्याचा दर्जा नाही. त्यामुळे दर कमी आहेत. बेदाण्याची गुणवत्ता हवी, तरच दर मिळतील. - एन. बी. म्हेत्रे, बेदाणातज्ज्ञ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT