raisin
raisin  
मुख्य बातम्या

नऊशे कोटींचा बेदाणा पडून

टीम अॅग्रोवन

सांगली ः राज्य आणि परराज्यातील बाजारपेठा सुरु झाल्या असल्या तरी अजून बेदाण्याला अपेक्षित मागणी नाही. राज्यात आजअखेर ९५ हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून  ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. शीतगृहात ठेवलेल्या बेदाण्याची रक्कम अंदाजे ९०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांना अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.  राज्यात दरवर्षी सरासरी बेदाण्याचे १ लाख ९० हजार टन उत्पादन होते. यंदा द्राक्ष हंगामात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षाची विक्री करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. त्यामुळे यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्याचवेळी बाजार पेठा बंद असल्याने बेदाण्याची विक्री करता आली नाही. जून महिन्यापासून बेदाण्याचे सौदे सुरु झाले. परंतु अपेक्षित उठाव झाला नाही. मागणी कमी असली तरी दरात चढ-उतार नसल्याचे बेदाणा उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले.  सध्या राज्यात ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शीतगृहात शेतकऱ्यांनी ठेवला आहे. त्याची विक्री अजून बाकी आहे. बेदाणा विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी पुढे येत असले तरी अजून अपेक्षित मागणी नाही. गेल्या महिन्यापासून बेदाण्याला मागणी वाढू लागली आहे. दसरा आणि दिवाळी या सणाला बेदाण्याच्या मागणीत अधिक वाढ होईल, आणि दरही वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तासगावात बाजारात ३५ हजार टन विक्री  तासगाव बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सुरु आहेत. सौद्याला ८०० टन बेदाण्याची आवक होत असून ५०० ते ५५० टन विक्री होत आहे. तासगाव बाजार समितीतून सहा महिन्यात ३५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील बेदाणा दृष्टिक्षेप (टनांत) २ लाख १० हजार उत्पादन 

९५ हजार ते १ लाख  बेदाण्याची विक्री 

८५ हजार ते ९० हजार शिल्लक बेदाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT