दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान
दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान 
मुख्य बातम्या

दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान

वृत्तसेवा

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. थंडी गायब झाली असून, उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.४) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ईशान्य मोसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, नगर, बीड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.  राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असून, पावसाला पोषक हवामान होताच तापमान आणि उकाड्यात वाढ होऊन, गारठा नाहीसा झाला आहे. बुधवारी (ता. ३) गोंदिया येथे निचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.९ अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले. उर्वरीत राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली.   कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार श्रीलंका आणि कोमोरीन समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून लक्षद्वीप बेटे आणि अग्नेय अरबी समुद्रात सक्रिय आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकणार असून, आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विजा, मेघगर्जनांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, नांदेड. बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३१.२ (१७.४), नगर ३३.४ (-), जळगाव -(१५.२), कोल्हापूर ३१.८ (२३.३), महाबळेश्‍वर २५.५(१५.९), मालेगाव ३१.४ (१५.२), नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.२ (२२.८), सातारा ३१.६ (२१.७), सोलापूर ३४.२ (२१.१), सांताक्रूझ ३६ (२४.५), अलिबाग ३२.१ (२८.१), डहाणू ३४.८ (२२.५), रत्नागिरी ३६.९ (२५.७), औरंगाबाद २९.७ (१५.८), नांदेड ३३.४ (२०), परभणी ३१.६ (१८.१), अकोला ३१.९ (१७.६), अमरावती ३१ (१६.३), ब्रह्मपुरी ३४.७ (२०.६), बुलडाणा २९.५ (१५.५), चंद्रपूर ३०.८ (२०.२), गडचिरोली ३१.२ (२१.४), गोंदिया ३०.६ (१३.८), नागपूर ३१.२ (१८.८), वर्धा ३१ (१९.९), वाशीम ३३ (१६), यवतमाळ ३०.५ (१८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT