The rains sprouted the soybeans
The rains sprouted the soybeans 
मुख्य बातम्या

पावसाने सोयाबीनला फुटले कोंब

टीम अॅग्रोवन

वाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे यंदाही खरिपातील पिकांना फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब बाहेर आले आहेत. याचा उत्पादनावर व दर्जावर विपरीत परिणाम होणार आहे. भर जहॉंगीर परिसरात मूग, उडिदाप्रमाणे सोयाबीनला अंकुर आल्याने कृषी आणि महसूल विभागाने पाहणी करून सर्वेक्षण करण्याची मागणी युवासेना तालुका उपप्रमुख बळीराम चोपडे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसाने मूग, उडिदाचे नुकसान झाले. परंतु ही पिके शासनाच्या निकषामध्ये बसले नसल्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आता शेतकऱ्यांची मदार असलेल्या सोयाबीन पिकालाही पावसाचा फटका बसत आहे. शेतातील उभ्या हिरव्या सोयाबीन शेंगांमधून अंकुर दिसून येत आहे.

रिसोड तालुक्यातील भर जहाँगिर महसूल मंडळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकात हा प्रकार दिसून येत आहे. भर जहाँगिर येथील बळीराम चोपडे यांच्या शेतातील सुमारे सहा एकर शेतातील सोयाबीन पिकात हिरव्या शेंगांमधून अंकुर बाहेर आले आहेत. असाच प्रकार इतर शेतकऱ्यांबाबतही होत आहे. सोयाबीन पीक हातचे जाणार असल्याची त्यांच्यात चिंता वाढली आहे.

सततच्या पावसामुळे यंदाही सोयाबीनच्या उत्पादनात घटीची चिन्हे आहेत. त्यातच शेंगांना कोंब फुटल्याने उत्पादनाचा दर्जा घटणार आहे. संबंधित विभागांनी तत्काळ सर्वेक्षण करावे - बळीराम चोपडे, उपतालुका, रिसोड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT